भक्तांचा निर्धार पक्का; यंदाही डॉल्बीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:36 PM2017-09-04T23:36:11+5:302017-09-04T23:36:15+5:30

Confirmation of the devotees; Push the Dolby this year | भक्तांचा निर्धार पक्का; यंदाही डॉल्बीला धक्का

भक्तांचा निर्धार पक्का; यंदाही डॉल्बीला धक्का

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, पारंपरिक वाद्यांचे सूर अन् रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव, अशा भक्तीमय वातावरणात दहा दिवसांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त विसर्जनाचा अध्याय गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी कायम ठेवला. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना अनेकांचा कंठ दाटून आला.
सातारा शहरात सोमवारी दहा दिवसांच्या घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीमुळे ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे विसर्जन मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली नाही. भाविक व नागरिकांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
विसर्जन मिरवणुकीस सोमवारी सकाळपासूनच प्रारंभ झाला. राजवाडा येथून मिरवणुका मार्गस्थ झाल्या. मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, पाचशे एक पाटी, शनिवार चौक मार्गे मोती चौकातून पुढे बसाप्पा पेठ चौकपर्यंत मिरवणुका काढण्यात आल्या. दहा दिवसांचे बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी तातडीने मंडप हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
सायंकाळी पाचनंतर मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी मुख्य चौकांमध्ये मिरवणूक पाहायला गर्दी केली होती. प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या जागेत पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यात क्रेनच्या साह्याने शिस्तबद्ध पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या व्यतिरिक्त हुतात्मा स्मारक, कोडोली, दगडी शाळा परिसरातील कृत्रिम तळे व पालिकेच्या जलतरण तलावातही मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांना याहीवर्षी डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीचा अध्याय कायम ठेवल्याने कोठेही डॉल्बी दणाणली नाही. मात्र, पारंपरिक वाद्यांच्या निनादाने ऐतिहासिक शहर उल्हासित झाले. मंगळवारी (दि. ५) साताºयासह जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. यासाठी पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
प्रतापसिंह शेती फार्म हाऊसच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात मूर्ती विसर्जनाचे व्हिडीओ शूटिंगही यावेळी करण्यात येणार आहे. तब्बल शंभर टन वजनी के्रनच्या साह्याने बाप्पांच्या मूर्र्तींचे विसर्जन केले जात आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
पोलिसांकडून
फटाके जप्त
विसर्जन मिरवणुकीत फटाके वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. सोमवारी काही गणेश मंडळांचे कार्यकर्तेे फटाके वाजविण्याच्या तयारीत होते. तत्पूर्वीच पोलिस दलाच्या वतीने सर्व फटाके जप्त करण्यात आले.
महावितरणच्या
पथकाचा पहारा
गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महावितरण विभागाचे पथक मिरवणूक मार्गावर सज्ज होते. वीज पुरवठा खंडित झाल्यास अथवा कोणता अडथळा आल्यास या पथकाकडून तातडीने दुरुस्ती केली.
पर्यायी मार्गाने वळविली वाहतूक
विसर्जन मिरवणुका सोमवारी सायंकाळी सुरू झाल्यानंतर पोवई नाक्याकडून येणारी वाहने नगरपालिकेच्या जुन्या प्रवेशद्वाराकडून पुढे बोगद्याकडे पाठविली जात होती. कमानी हौदापासून मोती चौकापर्यंत केवळ विसर्जन मिरवणूक सुरू होती. मोती चौकात मिरवणुकीमुळे कोंडी होऊ नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात होती. मोती चौकात वॉच टॉवरवर उभे राहून पोलिस मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते.

Web Title: Confirmation of the devotees; Push the Dolby this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.