फलटणला पेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:06+5:302021-06-09T04:49:06+5:30
फलटण : फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच युवक काँग्रेसतर्फे फलटण येथे एका पेट्रोलपंपावर पेट्रोल दरवाढीच्या विरोधात केंद्र ...
फलटण : फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटी तसेच युवक काँग्रेसतर्फे फलटण येथे एका पेट्रोलपंपावर पेट्रोल दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
या वेळी केंद्र सरकार हटाव व नरेंद्र मोदी हटाव अशा घोषणा देण्यात आल्या.
या वेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र बेडके, फलटण तालुका कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे, तालुका ग्रामीण उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, जिल्हा सरचिटणीस शंकर लोखंडे, जिल्हा अनुसूचित जाती जमातीच्या सेलचे जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ दैठणकर, शहराध्यक्ष मोहित बारशीकर, अल्पसंख्य सेलचे फलटण तालुकाध्यक्ष ताजुभाई बागवान, शहर अध्यक्ष अलताब पठाण, फलटण शहराध्यक्ष पंकज पवार, फलटण तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य कदम, फलटण शहर युवक अध्यक्ष प्रीतम जगदाळे तसेच काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपशासित केंद्र सरकारने भरमसाठ पेट्रोल, डिझेलचे दर वाढवून गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला अडचणीत आणले आहे. महागाईचे चटके सर्वांना बसू लागले आहे. पेट्रोल, डिझेल स्वस्त करावेत, अशी मागणी या वेळी निवेदनात करण्यात आली. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली असून भाजप हटाव, नरेंद्र मोदी हटाव अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.
फोटो ०७फलटण -आंदोलन
फलटण येथे पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ एका पंपावर महेंद्र बेडके, आमिरभाई शेख, प्रीतम जगदाळे, ताजुद्दीन बागवान यांनी आंदोलन केले. (छाया : नसीर शिकलगार)