काँग्रेसची आज सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:04+5:302021-07-09T04:25:04+5:30
वारीची आस वाढली सातारा : आषाढी एकादशी जवळ येऊ लागल्यामुळे वारकरी वर्गात वारीची आस वाढली आहे. आषाढी वारीसाठी नियमाप्रमाणे ...
वारीची आस वाढली
सातारा : आषाढी एकादशी जवळ येऊ लागल्यामुळे वारकरी वर्गात वारीची आस वाढली आहे. आषाढी वारीसाठी नियमाप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात पालखी सोहळ्यांचे पूजन होऊ लागले आहे. लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे शिथिलता असल्यामुळे कोरोना नियमावलीचे पालन करून दर्शनाची मुभा मिळण्याची शक्यता वारकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना वारीची आस लागली आहे.
बळीराजाला पावसाची प्रतीक्षा
सातारा : पावसाने उघडीप दिल्याने खरिपातील पेरणीतील पिके पाण्यावाचून सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करू लागला आहे. वळिवाच्या पावसामुळे निर्माण झालेल्या ओलीवर आगाप पेरण्यात आल्यात आल्या आहेत. उडीद, सोयाबीन, चवळी, मूग आदी पिके जोमात आली आहेत. मात्र, आता पिकांना पाण्याची सक्त गरज आहे. पाऊस पडला नाही तर हा खरिपातील पेरा वाया जाणार आहे. पाण्याचे स्रोतही अद्याप कोरडेच असल्याने शेतकरीवर्ग पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
शिवा संघटनेचे निवेदन
सातारा : वीरशैव लिंगायत हिंंदू वाणी समाज स्माशनभूमीच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याची मागणी शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील निदान, प्रशांत तिंगडे, सिध्दलिंग स्वामी, रत्नाकर शेटे, दीपक साखरे, गोविंद म्हमाणे, दत्ता देशमाने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
सातारा : आॅर्गनायझेशन फॉर राईटस् आॅफ ह्युमन संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी साखळी उपोषण करण्यात आले. या वेळी सरकारच्या विरोधात देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपात नोकरी मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी साखळी उपोषण करण्यात आले.
बायोगॅस पुन्हा चर्चेत
सातारा : बदलती जीवनशैली आणि वाढत्या यांत्रिकीकरणामुळे पशुधन कमी झाले आहे. शेती व्यवसायामध्ये आधुनिकता आल्याने बैलांच्या मशागतीऐवजी यांत्रिक शेती होऊ लागली आहे. त्यातच घरोघरी गॅस आल्याने गायी, म्हशींच्या शेणावर चालणारी बायोगॅस संयंत्रे काळाच्या ओघात कालबाह्य ठरली आहेत. मात्र ही संयंत्रे पुन्हा चर्चेत येऊ लागली आहेत.
..............