पिंगळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:01+5:302021-03-30T04:22:01+5:30

म्हसवड : माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जीवन खंडू कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंगळी बुद्रुक येथील ...

Congress flag on Pingali Gram Panchayat | पिंगळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

पिंगळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

Next

म्हसवड : माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जीवन खंडू कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पिंगळी बुद्रुक येथील नवनिर्वाचित माण तालुका युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲड. संदीप सजगणे यांनी माणच्या राजकारणात एन्ट्री केली आहे. पिंगळी बुद्रुक ग्रामपंचायत सरपंच निवडणूक सोमवारी झाली. यामध्ये जीवन खंडू कांबळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

तालुक्यातील जबाबदारी पार पाडत आपल्या गावापासूनच सुरुवात केली आहे.

माण तालुक्यातील काँग्रेस पक्ष काही काळ बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते; मात्र आता पक्षाने तालुक्यात पुन्हा एकदा जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच पिंगळी बुद्रुकच्या सरपंचपदाची लढाई कायदेशीर आणि वादग्रस्त अशी असल्याने यासाठी न्यायालयीन लढाई लढावी लागली.

मुंबई उच्च न्यायालयातील याचिका असतील किंवा जिल्हाधिकारी येथील सरपंच निवडीबाबत अर्ज असतील, या सर्वांचे काम स्वतः संदीप सजगणे यांनी पाहिले. स्वतःच्या गटाचा सरपंच निवडून आपल्या राजकारणातील सुरुवात केली आहे. याबद्दल माण-खटावचे काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांनी संदीप सजगणे, नूतन सरपंच कांबळे यांचे अभिनंदन केले.

सरपंचपदाच्या निवडीत वसंत सजगणे, धर्मराज जगदाळे, हिंमतराव जगदाळे, दीपक सजगणे यांनी जीवन खंडू कांबळे यांनी कौतुक केले आहे.

फोटो २९पिंगळी-सरपंच

पिंगळीच्या सरपंचपदी जीवन कांबळे यांची निवड झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. यावेळी अड. संदीप सजगणे, वसंत सजगणे, धर्मराज जगदाळे, हिंमतराव जगदाळे, दीपक सजगणे उपस्थित होते. (छाया : सचिन मंगरुळे)

Web Title: Congress flag on Pingali Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.