मेळाव्याच्या निमित्ताने कॉँग्रेस नेते एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:44 AM2017-11-01T00:44:02+5:302017-11-01T00:45:18+5:30

¸fZTf½¹ff¨¹ff d³fd¸fØff³fZ IYfgh¦fiZÀf ³fZ°fZ EIYUMX»fZ »fûIY¸f°f ³¹fcþ ³fmMXUIÊY Àffa¦f»fe : IYfgh¦fZiÀf¨¹ffU°fe³fZ SXfª¹ff°f ÀfbøY Óff»fZ»¹ff kAfIiYfZVf ¸fZTf½¹ffl¨fe Àffa¦f°ff ¹fZ°¹ff y ³ffZ½WZÔX¶fSX»ff Àffa¦f»fe°f WXfZ¯ffSX AfWZX. ´fdV¨f¸f ¸fWXfSXfáÑXf¨ff WXf ¸fZTfUf WXfZ¯ffSX AÀf»¹ff³fZ ¹ff¨¹ff d³f¹ffZþ³ffÀffNXe Af¹ffZdþ°f ¶f`NXIYe°f ´fiQe§fÊ IYf»ffUd²f³fa°fSX IYfgh¦fiZÀf¨fZ ÀfUÊ ³fZ°fZ EIYUMX»fZ. ¦fMXf-°fMXf°f dUÀIYTe°f Óff»fZ»fe IYfgh¦fiZÀf ¹ff´fbPZXWXe EIYÀfa²f dQÀfZ»f, AÀfZ ¸f°f Af. ´f°fa¦fSXfU IYQ¸f ¹ffa³fe ¸fa¦fTUfSXe ´fÂfIYfSX ´fdSX¿fQZ°f ½¹f¢°f IZY»fZ. ¹fZ±fe»f Af¸fSXfBÊ ¢»f¶f¨¹ff Àf·ff¦fÈWXf°f IYfgh¦fiZÀf¨fZ ´fdV¨f¸f ¸fWXfSXfáÑXf°fe»f ³fZ°fZ, dþ»‘f°fe»f ´fi¸fbJ IYf¹fÊIY°fZÊ ¹ffa¨fe ¶f`NXIY ¸fa¦fTUfSXe ´ffSX ´fOX»fe. ¹ff ¶f`NXIYe°f ¸fZTf½¹ff¨fZ ´fi¸fbJ d³f¸faÂfIY Af. ´f°fa¦fSXfU IYQ¸f ¹ffa³fe ¸ff¦fÊQVfʳf IZY»fZ. ¹ffUZTe ¸ffþe ¸faÂfe Àf°fZþ ´ffMXe»f, Af. þ¹fIbY¸ffSX ¦ffZSmX, Af. Af³faQSXfU ´ffMXe»f, Af. ¸ffZWX³fSXfU IYQ¸f, IYfZ»WXf´fcSX¨fZ ¸ffþe Af¸fQfSX ´fe. E³f. ´ffMXe»f, WXfdRYþ ²fØfbSmX, CX¸ffþe Àf³f¸fOXeIYSX, ¹fbUIY ´fiQZVf IYfgh¦fiZÀf¨fZ A²¹fÃf dUVUdþ°f IYQ¸f, ´fiQZVf ÀfSXd¨fMX¯feÀf ´fiIYfVf ¹fZ»f¦fb»fUfSX, ´fiIYfVf Àff°f´fb°fZ, ´fiQZVf d¨fMX¯feÀf °ff`dRYIY ¸fb»ff¯fe, ¸fdWX»ff Af§ffOXe¨¹ff ´fiQZVf CX´ff²¹fÃff Vf`»fþf·ff·fe ´ffMXe»f, þ¹fßfe°ffBÊ ´ffMXe»f, ÀffZ»ff´fcSX¨fZ ´fÃff¨fZ dþ»WXf²¹fÃf ´fiIYfVf ´ffMXe»f, IYfZ»WXf´fcSX VfWXSX dþ»WXf²¹fÃf ´fi»WXfQ ¨f½WXf¯f AfQe CX´fdÀ±f°f WXfZ°fZ. ¸fZTf½¹ff³fa°fSX ´fÂfIYfSXfaVfe ¶ffZ»f°ff³ff IYQ¸f ¸WX¯ff»fZ IYe, ¹fZ°¹ff y ³ffZ½WZÔX¶fSX SXfZþe Àffa¦f»fe¨¹ff ³fZd¸f³ff±f³f¦fSX ¹fZ±fe»f IY»´fQib¸f IiYeOXfa¦f¯ffUSX Qb´ffSXe r Ufþ°ff ¸fZTfUf WXfZ¯ffSX AfWZX. ¸fSXfNXUfOXf, dUQ·fÊ Afd¯f IYfZIY¯f¨ff Qf`SXf IYøY³f SXfª¹ff°fe»f U IZÔYQif°fe»f ´fi¸fbJ ³fZ°fZ Àffa¦f»fe°fe»f AfIiYfZVf ¸fZTf½¹ffÀf CX´fdÀ±f°f SXfWX¯ffSX AfWZX°f. SXfª¹ff°fe»f ·ffþ´f ÀfSXIYfSX»ff °fe³f U¿fZÊ ´fc¯fÊ Óff»fe AfWZX°f. IZÔYQi U SXfª¹ff°fe»f ÀfSXIYfSX³fZ A³fZIY RYÀfUZ d³f¯fʹf §fZ°f»fZ. A±fʽ¹fUÀ±ff AOX¨f¯fe°f Af¯f¯¹ff¶fSXfZ¶fSX¨f Àff¸ff³¹f ¸ff¯fÀff¨fZ þ¦f¯fZ Ad²fIY IYNXe¯f IYSX¯¹ffÀf °fZ IYfSX¯fe·fc°f NXSX»fZ AfWZX°f. ³ffZMXf¶faQe, þeEÀfMXe Afd¯f IYþʸffRYe AVff´fiIYfSX¨fZ d³f¯fʹf ÀfSXIYfSX¨¹ff AIYf¹fÊÃf¸f°fZ¨fZ QfJ»fZ AfWZX°f. °¹ff¸fbTZ þ³f°fZ°f AÀf»fZ»ff AÀfa°ffZ¿f Af°ff ½¹f¢°f WXfZ°f AfWZX. SXfª¹ff°fe»f ¦fif¸f´fa¨ff¹f°f d³fUOX¯fbIYe°f þ³f°fZ³fZ ´fb³WXf IYfgh¦fiZÀfUSX dUVUfÀf ½¹f¢°f IZY»ff AfWZX. dþ»‘f°fWXe IYfgh¦fiZÀf IiY¸ffaIY EIYUSX¨f AfWZX. dþ»WXf ´fdSX¿fQZ°fe»f ·ffþ´f¨ff dUþ¹f WXf EIY A´f§ff°f WXfZ°ff. ¹ff´fbPZXWXe ´fi°¹fZIY d³fUOX¯fbIYe°f IYfgh¦fiZÀf»ff þ³f°fZ¨fZ ´ffNX¶fT d¸fTZ»f. þ³f°fZ¨¹ff ´fiV³ffUSX Àff°f°¹ff³fZ dþ»‘f°fe»f IYfgh¦fiZÀf¨fe AfaQfZ»f³fZ ÀfbøY¨f AfWZX°f. ¹ff´fbPZXWXe U¿fÊ·fSX AfaQfZ»f³ffa¨¹ff ¸ff²¹f¸ff°fc³f þ³f°fZ¨fZ ´fiV³f IYfgh¦fiZÀf ¸ffaOX¯ffSX AfWZX, AÀfZ °¹ffa³fe À´fáX IZY»fZ. Àf°fZþ ´ffMXe»f ¸WX¯ff»fZ IYe, ¸fZTfUf Óff»¹ff³fa°fSXWXe Af¸f¨¹ffIYOZX U¿fÊ·fSXf¨ff AþZÔOXf ´fiQZVf IYf¹fÊIYfdSX¯fe³fZ dQ»ff AfWZX. °¹ff´fi¸ff¯fZ Af¸WXe þ³f°fZ¨¹ff ´fiV³ffaÀffNXe VffÀf³ffVfe Àfa§f¿fÊ IYSXe°f SXfWcX. ³f ¹fZ¯ffSmX RZYIY»fZ þf°fe»f : IYQ¸f IYfgh¦fiZÀf¨¹ff ÀfUÊ ³fZ°¹ffa³ff Af°ff EIYÂf Af»fZ¨f ´ffdWXþZ. ´fÃff¨fe °ffIYQ ´fi°¹fZIY AfaQfZ»f³ff°f ¹ff´fbPZX dQÀfc³f ¹fZBÊ»f. °¹ff¸fbTZ þZ Af¸f¨¹ffÀffZ¶f°f ¹fZ°fe»f °fZ SXfWX°fe»f, ³f ¹fZ¯ffSmX ¶ffWZXSX RZYIY»fZ þf°fe»f, AÀff BVffSXf ´f°fa¦fSXfU IYQ¸f ¹ffa³fe ´fÂfIYfSXfaVfe ¶ffZ»f°ff³ff dQ»ff.

Congress leaders gathered together on the occasion of the gathering | मेळाव्याच्या निमित्ताने कॉँग्रेस नेते एकवटले

मेळाव्याच्या निमित्ताने कॉँग्रेस नेते एकवटले

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कॉँगे्रसच्यावतीने राज्यात सुरू झालेल्या ‘आक्रोश मेळाव्या’ची सांगता येत्या ८ नोव्हेंबरला सांगलीत होणार आहे. पश्चिम महाराष्टÑाचा हा मेळावा होणार असल्याने याच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत प्रदीर्घ कालावधिनंतर कॉँग्रेसचे सर्व नेते एकवटले. गटा-तटात विस्कळीत झालेली कॉँग्रेस यापुढेही एकसंध दिसेल, असे मत आ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
येथील आमराई क्लबच्या सभागृहात कॉँग्रेसचे पश्चिम महाराष्टÑातील नेते, जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत मेळाव्याचे प्रमुख निमंत्रक आ. पतंगराव कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. आनंदराव पाटील, आ. मोहनराव कदम, कोल्हापूरचे माजी आमदार पी. एन. पाटील, हाफिज धत्तुरे, उमाजी सनमडीकर, युवक प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, प्रदेश सरचिटणीस प्रकाश येलगुलवार, प्रकाश सातपुते, प्रदेश चिटणीस तौफिक मुलाणी, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, सोलापूरचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, कोल्हापूर शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण आदी उपस्थित होते.
मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले की, येत्या ८ नोव्हेंबर रोजी सांगलीच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर दुपारी १ वाजता मेळावा होणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणचा दौरा करून राज्यातील व केंद्रातील प्रमुख नेते सांगलीतील आक्रोश मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र व राज्यातील सरकारने अनेक फसवे निर्णय घेतले. अर्थव्यवस्था अडचणीत आणण्याबरोबरच सामान्य माणसाचे जगणे अधिक कठीण करण्यास ते कारणीभूत ठरले आहेत. नोटाबंदी, जीएसटी आणि कर्जमाफी अशाप्रकारचे निर्णय सरकारच्या अकार्यक्षमतेचे दाखले आहेत. त्यामुळे जनतेत असलेला असंतोष आता व्यक्त होत आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने पुन्हा कॉँग्रेसवर विश्वास व्यक्त केला आहे. जिल्ह्यातही कॉँग्रेस क्रमांक एकवरच आहे. जिल्हा परिषदेतील भाजपचा विजय हा एक अपघात होता. यापुढेही प्रत्येक निवडणुकीत कॉँग्रेसला जनतेचे पाठबळ मिळेल. जनतेच्या प्रश्नावर सातत्याने जिल्ह्यातील कॉँग्रेसची आंदोलने सुरूच आहेत. यापुढेही वर्षभर आंदोलनांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कॉँग्रेस मांडणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सतेज पाटील म्हणाले की, मेळावा झाल्यानंतरही आमच्याकडे वर्षभराचा अजेंडा प्रदेश कार्यकारिणीने दिला आहे. त्याप्रमाणे आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी शासनाशी संघर्ष करीत राहू.
न येणारे फेकले जातील : कदम
कॉँग्रेसच्या सर्व नेत्यांना आता एकत्र आलेच पाहिजे. पक्षाची ताकद प्रत्येक आंदोलनात यापुढे दिसून येईल. त्यामुळे जे आमच्यासोबत येतील ते राहतील, न येणारे बाहेर फेकले जातील, असा इशारा पतंगराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

Web Title: Congress leaders gathered together on the occasion of the gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.