उंब्रजला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:36+5:302021-01-20T04:37:36+5:30

उंब्रज : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून ...

Congress-NCP alliance bet on Umbraj | उंब्रजला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजी

उंब्रजला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजी

Next

उंब्रज : येथील ग्रामपंचायतीच्या १७ जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आले, तर भाजप व समविचारी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या गटाच्या भैरवनाथ जनविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले.

सह्याद्री उंब्रज विकास आघाडीच्या वतीने १४ जागा लढवण्यात आल्या. त्यामध्ये या आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या वतीनेही १४ जागा लढवण्यात आल्या. त्यापैकी २ जागांवर त्यांना यश आले, तर भैरवनाथ जनविकास आघाडीच्या वतीने सहा जागा लढवण्यात आल्या. त्यापैकी दोन जागांवर त्यांना यश मिळाले. वॉर्ड क्रमांक एकमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे प्रशांत पाटील व माधुरी डुबल यांचा विजय झाला, तर भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे विलास आटोळे विजयी झाले. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीच्या विजया भिसे-पाटील, किसनराव माळी, नामदेव कांबळे हे विजयी झाले. विजया भिसे-पाटील या सर्वाधिक विक्रमी मतांनी विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे योगराज जाधव व सुनीता माने विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक चारमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे सुधाकर जाधव, सुनंदा जाधव, शारदा कोळी विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे विजय जाधव, प्रमिला जाधव व प्रियांका वाघमारे विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक सहामध्ये भैरवनाथ जनविकास आघाडीचे उमेश काशीद व कोमल कमाने विजयी झाल्या. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या जयश्री ढवळे विजयी झाल्या.

Web Title: Congress-NCP alliance bet on Umbraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.