उंब्रजला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:34 AM2021-01-21T04:34:55+5:302021-01-21T04:34:55+5:30

उंब्रज : येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून ...

Congress-NCP alliance bet on Umbraj | उंब्रजला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजी

उंब्रजला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची बाजी

Next

उंब्रज : येथील ग्रामपंचायतींच्या १७ जागांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व राष्ट्रीय काँग्रेस आघाडीच्या सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून आले, तर भाजप व समविचारी भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या गटाच्या भैरवनाथ जनविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून आले.

सह्याद्री उंब्रज विकास आघाडीच्यावतीने १४ जागा लढविण्यात आल्या. त्यामध्ये या आघाडीचे १३ उमेदवार विजयी झाले. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्यावतीनेही १४ जागा लढविण्यात आल्या. त्यापैकी २ जागांवर त्यांना यश आले, तर भैरवनाथ जनविकास आघाडीच्यावतीने सहा जागा लढवण्यात आल्या. त्यापैकी दोन जागांवर त्यांना यश मिळाले. वॉर्ड क्रमांक एकमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे प्रशांत पाटील व माधुरी डुबल विजयी झाले, तर भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे विलास आटोळे विजयी झाले. वॉर्ड क्रमांक दोनमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीच्या विजया भिसे-पाटील, किसनराव माळी, नामदेव कांबळे हे विजयी झाले. विजया भिसे-पाटील या सर्वाधिक विक्रमी मतांनी विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे योगराज जाधव व सुनीता माने विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक चारमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे सुधाकर जाधव, सुनंदा जाधव, शारदा कोळी विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक पाचमध्ये सह्याद्री उंब्रज विकास आघाडीचे विजय जाधव, प्रमिला जाधव, प्रियांका वाघमारे विजयी झाल्या. वॉर्ड क्रमांक सहामध्ये भैरवनाथ जनविकास आघाडीचे उमेश काशीद व कोमल कमाने विजयी झाल्या, तर भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या जयश्री ढवळे विजयी झाल्या.

Web Title: Congress-NCP alliance bet on Umbraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.