पाटणला काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:16+5:302021-07-05T04:24:16+5:30
पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुका उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, सरचिटणीस अॅड. ...
पाटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी तालुका उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, सरचिटणीस अॅड. राजन भिसे उपस्थित होते.
नरेश देसाई म्हणाले, पाटण तालुक्यात पक्षाचे नाही तर गटाचे राजकारण सुरू आहे. मात्र, काँग्रेस एकमेव असा पक्ष आहे की त्यामध्ये गट नाही. सर्वजण एकसंध आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस पक्षवाढीचे काम जोरात सुरु असून तरुणांना विविध पदांवर काम करण्याची संधी दिली जात आहे. पाटण तालुक्यातही काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असून तीन वर्षात तालुक्यात काँग्रेस पक्ष नावारूपाला आलेला असेल. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी न झाल्यास वरिष्ठांकडून आदेश आल्यास या निवडणुका लढविणार आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून तालुक्यात विकासकामे सुरू आहेत. मात्र या विकासकामांच्या भूमिपूजन अथवा उद्घाटन समारंभास घटक पक्षांना डावलले जात आहे. तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादीकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याची खंत या वेळी नरेश देसाई व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.