‘कराड उत्तर’मध्ये काँग्रेसची यात्रा!
By admin | Published: August 31, 2014 09:34 PM2014-08-31T21:34:29+5:302014-09-01T00:05:40+5:30
रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संवाद यात्रेस प्रतिसाद
कऱ्हाड : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि आ. आनंदराव पाटील यांच्या माध्यमातून झालेल्या १५० कोटी निधीच्या विकासकामांची माहिती जनतेला व्हावी, यासाठी कऱ्हाड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या संवाद यात्रेस प्रतिसाद मिळत आहे.पवारवाडी, ता. कोरेगाव येथून संवादयात्रेस प्रारंभ झाला. यावेळी कऱ्हाड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसचे धैर्यशील कदम, ज्येष्ठ नेते भीमराव पाटील, हिंदुराव चव्हाण, संपतराव माने, सुदाम दीक्षित, सुनील पाटील, भीमराव डांगे, कोरेगाव पंचायत समिती सदस्या प्रतिभा भोसले, शैलेश चव्हाण, जितेंद्र भोसले, उमेश साळुंखे, प्रकाश गुरव, अमर मुल्ला, लक्ष्मण गोरे, भरत जाधव, धैर्यशील सुफले, सागर शिवदास, गोल्डन पवार, अमित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
धैर्यशील कदम म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी कऱ्हाड उत्तरमध्ये देखील काँग्रेसच्या विचारांचा आमदार झाला पाहिजे. गेली २५ वर्षे सत्ता एकाच घरात आहे. त्यामुळे विकासाला वाव मिळत नाही. एक प्रकारची सरंजामशाही आपल्या या मतदारसंघामध्ये झाली आहे. आज खटाव-माणच्या जनतेने तिथे सत्तांतर केले, त्याची प्रचीती माण-खटावच्या ६०० कोटींच्या विकासकामांत आपणास दिसून येते.’यावेळी सुदाम दीक्षित, जितेंद्र भोसले, उमेश साळुंखे, एम. जी. थोरात, संभाजी भोसले यांची भाषणे झाली. कार्यक्रमास शिवाजी साळुंखे दुश्यंत शिंदे, दीपक शिंदे, विकास जाधव, अविनाश शेडगे, तात्या साबळे, प्रवीण भोसले यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)