कोपर्डे हवेलीत काँग्रेसचे मत राष्ट्रवादीच्या पारड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:53 AM2021-02-26T04:53:38+5:302021-02-26T04:53:38+5:30
कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य निवडून आले होते, तर काँग्रेसचे सात सदस्य होते. सरपंच पदासाठी ...
कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ सदस्य निवडून आले होते, तर काँग्रेसचे सात सदस्य होते. सरपंच पदासाठी झालेल्या मतदानात नेताजी चव्हाण यांना एक मत जादा पडल्याने ते नऊ मते घेऊन विजयी झाले. यामध्ये काँग्रेसचे एक मत फुटले, तर काँग्रेसचे अमित पाटील यांना सहा मते मिळाली. उपसरपंचपदी राष्ट्रवादीच्या शुभांगी चव्हाण यांना आठ मते मिळाली, तर काँग्रेसचे नानासाहेब चव्हाण यांना सात मते मिळाली.
निवड झाल्यानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, माजी संचालक बळवंतराव चव्हाण, रामचंद्र चव्हाण, माजी पोलीसपाटील प्रल्हाद पाटील, माजी उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, शंकरराव चव्हाण, महादेव चव्हाण, महेश चव्हाण, संभाजी चव्हाण, आबासाहेब चव्हाण, एस. डी. चव्हाण, उत्तम चव्हाण, शिवाजी चव्हाण, गणेश चव्हाण, राजेंद्र पाटील, शुभम चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
- चौकट
अपेक्षा वेगळी; झाले उलटे
राष्ट्रवादीची काठावरची सत्ता असल्यामुळे सरपंच, उपसरपंच निवडीत आपल्याला फुटून एखादे मत मिळेल, या अपेक्षेवर काँग्रेस निवडणुकीसाठी सामोरी गेली; पण झाले उलटेच. सरपंच पदासाठी काँग्रेसचेच एक मत राष्ट्रवादीच्या पारड्यात पडले. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेताजी चव्हाण यांना नऊ मते मिळाली.
फोटो : २५केआरडी०४
कॅप्शन : कोपर्डे हवेली, ता. कºहाड येथे निवडीनंतर सरपंच नेताजी चव्हाण व उपसरपंच शुभांगी चव्हाण यांचा सत्कार दत्तात्रय चव्हाण व एस. एन. मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.