काँग्रेस कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:31+5:302021-02-16T04:40:31+5:30

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुतराव ...

Congress workers block highway! | काँग्रेस कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला!

काँग्रेस कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखला!

Next

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुतराव जाधव, इंद्रजित जाधव, अमित जाधव, मधुकर जाधव, शैलेश चव्हाण यांच्यासह कॉंग्रेस, सेवादल, युवक कॉंग्रेस, एनएसयुआय, ओबीसी सेल, अल्पसंख्याक यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आंदोलकांनी प्रारंभी मसूर फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून ‘मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्ची खाली करा’ अशा घोषणा देत भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला. त्यानंतर महामार्गानजीक सभा झाली.

यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या काळ्या कायद्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत मोठी खदखद निर्माण झाली आहे. लोकशाही मोडीत काढण्याचा भाजपचा डाव आहे. महागाईविरोधात न्याय तसेच काळे कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. यापुढेही अशीच आंदोलने सुरू राहतील.

अजित पाटील म्हणाले, डिझेल, पेट्रोल दरवाढ तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. भाजप उद्योग विकायला काढत आहे. सार्वजनिक मालमत्तेचा लिलाव केंद्र सरकार करत आहे. मोदी सरकार म्हणजे रंगा बिल्लाचे सरकार आहे.

यावेळी उमेश साळुंखे, निवास थोरात, अमित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू यासाठी उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. यासह स्पेशल फोर्स तैनात करण्यात आले होते.

फोटो : १५केआरडी०६

कॅप्शन : मसूरफाटा, ता. कऱ्हाड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी कृषी कायद्याविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. (छाया : अजय जाधव)

Web Title: Congress workers block highway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.