इंधन महागाईविरोधात काँग्रेसची ढकलगाडी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:49 AM2021-06-09T04:49:16+5:302021-06-09T04:49:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सामान्य जनतेला प्रचंड महागाईचा सामना करावा लागत आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : पेट्रोल-डिझेलच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सामान्य जनतेला प्रचंड महागाईचा सामना करावा लागत आहे. या वाढत्या किमतीच्या विरोधात खंडाळा तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने खंडाळ्यात पेट्रोलपंपावर केंद्र सरकारचा निषेध करीत दुचाकी ढकलत अनोखे आंदोलन केले.
देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. तालुक्यात पेट्रोलचे दर शंभरीपार झाले आहेत. शेतीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात इंधन लागते. दरात वाढ झाल्याने शेतीची मेहनत खर्च वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या लोकांच्या भावना केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करून स्पष्ट करण्यात आल्या.
या वेळी खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एस. वाय. पवार, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, विधानसभा युवक अध्यक्ष प्रकाश गाढवे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र डोईफोडे, तालुका उपाध्यक्ष मस्कू शेळके, विशाल जाधव, रत्नकांत भोसले, शकील इनामदार, संतोष बावकर, समीर इनामदार उपस्थित होते.
०७खंडाळा-
खंडाळा येथे सोमवारी पेट्रोल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने गाडी ढकल आंदोलन केले. (छाया : दशरथ ननावरे)