एकीकडे दिलासा..दुसरीकडे धाकधूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:14 AM2021-02-21T05:14:52+5:302021-02-21T05:14:52+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या एकीकडे वाढत आहे. असे असताना शनिवारी ७० जणांच्या अहवालामध्ये एकाचाही बळी गेला नाही. त्यामुळे ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या एकीकडे वाढत आहे. असे असताना शनिवारी ७० जणांच्या अहवालामध्ये एकाचाही बळी गेला नाही. त्यामुळे एकीकडे दिलासा मिळत असताना दुसरीकडे मात्र, नवे ५३ रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्हा प्रशासनाची धाकधूक वाढत आहे.
जिल्ह्यात गत दहा दिवसांत दोनशेहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत, तर कोरोना मुक्तीचा दर कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असल्याचे संकेत आहेत. शुक्रवारी रात्री ७० जणांचे अहवाल बाधित आले. यामध्ये एकाचाही बळी गेला नाही. तसेच दिवसभरात ४५ जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्याचबरोबर रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी वाढत असून, शनिवारी ४५३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत १ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर बाधितांची संख्या ५७ हजार ९३४ इतकी झाली आहे. त्याचबरोबर ५५ हजार ९० जण आत्तापर्यत कोरोनामुक्त झाले आहेत.