ग्रामीण आरोग्य केंद्रे मंदिरे व्हावीत

By admin | Published: December 17, 2014 09:24 PM2014-12-17T21:24:22+5:302014-12-17T23:01:00+5:30

जावळी आढावा बैठक : जिल्हा परिषद उपाध्यक्षांकडून अधिकारी फैलावर

To construct temples in rural health centers | ग्रामीण आरोग्य केंद्रे मंदिरे व्हावीत

ग्रामीण आरोग्य केंद्रे मंदिरे व्हावीत

Next

कुडाळ : ‘ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये सर्वसामान्य जनतेला चांगल्या सुविधा दिल्या जाव्यात. आरोग्य केंद्रातील परिसराची स्वच्छता राखताना कर्मचाऱ्यांनी लाज बाळगू नये, ग्रामीण आरोग्य केंद्रेही आरोग्य मंदिरे व्हावीत, त्यादृष्टीने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करावे. तसेच आरोग्य सेवकाने यापुढे आरोग्य केंद्रातच राहणे बंधनकारक राहील, जो आरोग्यसेवक राहणार नाही, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,’ अशा कडक शब्दांत उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा विभागांचा आढावा घेतला.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्या उपस्थितीत बांधकाम, आरोग्य विभागाचंी आढावा बैठक पार पडली. यावेळी शिक्षण समिती सभापती अमित कदम, उपसभापती निर्मला कासुर्डे, मोहनराव शिंदे, रूपाली वारागडे, सारिका सपकाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, कार्यकारी अभियंता डी. एच. पालवे, आरोग्य अधिकारी, बांधकाम अभियंता निकम, शाखा अभियंता उपस्थित होते.
यावेळी आरोग्य सेवकांना आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य केंद्रातच राहण्याच्या सूचना कराव्यात, मी स्वत: आरोग्यकेंद्रांना भेटी देणार आहे. यावेळी जर तेथे आरोग्य कर्मचारी राहत नाही, हे निर्दशनास आले तर वैद्यकीय अधिकाऱ्यावरदेखील कारवाई केली जाईल.
ग्रामीण भागातील रुग्णांना सुविधांअभावी खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागू नये, रुग्णांना सुविधा पुरविल्या जाव्यात, यापुढेही सातारा जिल्हा आरोग्य, स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन राहावा, यासाठी प्रत्येकाने काम करावे.
बांधकाम विभागाचा आढावा घेताना अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून न राहता ठेकेदार करीत असलेल्या कामाची गुणवत्ता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन बघावी. ठेकेदाराला मंजूर कामे वेळेत करण्याच्या सूचना देऊन अधिकारी ती करून घ्यावीत.
यावेळी उपअभियंता यांनी तालुक्यात एकूण विविध विकासनिधीतून २३८ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ५३ पूर्ण, तर १०३ प्रगतिपथावर असल्याची माहिती दिली. सदस्य मोहनराव शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

तालुका पंचायत समिती इमारतीच्या कामावर अधिकारी, पदाधिकारी यांचे लक्ष नाही. ठेकेदार एक-एक महिना काम बंद ठेवत असल्याची बाब दत्ता मेढेकर यांनी निदर्शनास आणून दिली. यावेळी उपाध्यक्ष साळुंखे यांनी इमारतीचे काम ठेकेदाराकडून मार्चपूर्वी करून घ्या. इमारतीच्या अधर्वट कामाला मुदतवाढ देऊ नका, ठेकेदाराकडून वेळेत काम पूर्ण करून घ्या, मुदतवाढ, वाढीव निधीचा प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही, वेळेत काम करून घ्या, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Web Title: To construct temples in rural health centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.