पाटण तालुक्यात तीन हजार घरकुलांची उभारणी...
By admin | Published: April 29, 2017 01:09 PM2017-04-29T13:09:18+5:302017-04-29T13:09:18+5:30
२४१ गावांत कामे ; पाणी अन् साहित्य नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा
अरुण पवार/ लोकमत आॅनलाईन
पाटण (जि. सातारा) , दि. २९ : जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तसेच घर बांधायचे असेल तर त्याचे साहित्य डोक्यावर घेऊन पोहचवावे लागते. अशा दुर्गम पाटण तालुक्यात गेल्या काही महिन्यांत तब्बल ३०० घरकुले शासकीय अनुदानातून उभी राहिली आहेत. अशाप्रकारे तालुक्यातील २४१ गावांमध्ये घरकुलांची कामे झाली आहेत.
अनेक वर्षांपूवीर्पासून शासन घरकुल योजना राबवत आले आहे. त्यासाठी अनुदान दिले जात होते. मात्र काही अटी लादल्या जात होत्या. आता मात्र तसे नाही. प्रत्येकी लाभार्थ्यास १ लाख ४९ हजार रुपये अनुदान घर बांधणीसाठी दिले जाते. त्यामध्ये स्वत:चे कितीही पैसे घालून आणि पाहिजे तितक्या जागेत ऐसपैस घर बांधता येते.
पाटण पंचायत समितीच्या गटविकास आधिकाऱ्यांनी तालुक्यात स्वतंत्र अंभियत्यांची निवड करून घरकुल योजनेतील घर बांधणीसाठी प्रत्यक्षात देखरेख करून मार्गदर्शन केले. पाटण तालुका दुर्गम डोंगराळ असल्याने अनंत अडचणीना सामोरे जावे लागले.
काही लाभार्थी अंपग, अंध तर काहींना कुणीही नातेवाईक नसल्याने घर बांधणीच्या कामात कुणाचीही मदत मिळेना असे अनुभव गटविकास अधिकारी गौतम आणि अभियंता जगदीश पाटणकर यांना आले. तरीसुधदा अशावर मात करून दारिद्र रेषेखालील लोकांना त्यांच्या स्वपनातील घरे आणि तीही भव्य व लाईफटाईमसाठी उभी करण्याचे यशस्वी प्रयत्न पाटण तालुक्यात झाले आहेत.
दुर्गम तालुक्यात रोल मॉडेल घरकुल
पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ आहे. अशा परिसरात घरे बांधायची झाल्यास नाकीनऊ येत आहे. अशा परिस्थितीत सुध्दा पाटण पंचायत समिती प्रशासनाने गावांगावांत जाऊन लाभार्थींना घरे बांधण्यासाठी प्रसेत्साहत दिले. अडीअडचणीवर मात करून घरकुले बांधायचीच यासाठी बिडीओंनी वारंवार लाभाथी, ग्रामसेवक, इंजिनिअर यांचा बैठका घेऊन आढावा घेतला. त्यामुळेच आज तालुक्याच्या कोयना परिसरात सुध्दा प्रशस्त घरकुले उभी राहिली आहेत. तालुक्यातील ही घरे रोल मॉडेल ठरणार आहेत.
पाटण तालुक्यात सुमारे ३ हजार नव्या घरकुलांची उभारणी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. संबंधीत लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम तातडीने देण्यासाठी आमची यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. मी स्वत: जागेवर जाऊन घरकुल बांधकामाची पाहणी केली. निराधार महिला आणि पुरुषांना घरकुल बांधण्यासाठी आलेल्या अडचणीतून मार्ग काढला आहे.
- के. एस. गौतम,
गटविकास आधिकारी