दळणवळण सुरळीतसाठी बांधकाम विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:32+5:302021-07-30T04:40:32+5:30

वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडी, जोर व गोळेगाव या गावांवर अस्मानी संकट कोसळले. ...

Construction department ready for smooth communication | दळणवळण सुरळीतसाठी बांधकाम विभाग सज्ज

दळणवळण सुरळीतसाठी बांधकाम विभाग सज्ज

Next

वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात दुर्गम ठिकाणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या देवरुखवाडी, जोर व गोळेगाव या गावांवर अस्मानी संकट कोसळले. येथील दळणवळण व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याने सहा दिवस उलटूनही ही गावे संपर्काच्या बाहेर होती. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पूल वाहून गेले, संरक्षक कठडे तुटले, रस्त्यावरील भराव वाहून गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे त्यांना मदत पोहोचविण्यात अनेक अडचणी आल्या.

जोरच्या रस्त्यावरील अनेक पूल तुटल्यामुळे प्रशासनाच्यावतीने पाचारण करण्यात आलेल्या एनडीआरएफ टीमने बलकवडी जलाशयात जाऊन जखमी नागरिकांना उपचारासाठी रेस्क्यू केले.

मुंबई, कोकणात पडणारा मुसळधार पाऊस गेल्या दि. २२, २३ जुलै रोजी वाई तालुक्यातही जोरदार बरसला. वाईच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला. अनेक ठिकाणी पूल वाहून गेल्याने दळणवळणाला मोठी अडचणी निर्माण झाली. जोर, गोळेगाव परिसरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन रस्त्यावरील बहुतांश ठिकाणचे पूल वाहून गेले. ग्रामस्थांना लवकर मदत मिळण्यासाठी दळणवळण व्यवस्था सुरळीत होणे गरजेचे आहे.

यासाठी आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर, तहसीलदार रणजित देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव व पंचायत समितीचे बांधकाम अधिकारी एस. टी. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुक्यातील नुकसानग्रस्त रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. वाईच्या पश्चिम भागात जांभळी- वयगाव-दह्याट-बोरगाव रस्त्यावर पर्यायी व्यवस्थेचे काम सुरु आहे. याबरोबर गोळेगाव, घेरा केंजळ, वेरुळी, मांढरदेव घाट, पसरणी घाट यासह पश्चिम भागातील शिरगाव व सोळशी घाटांमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या रस्त्याची दुरुस्ती सुरु असून, यासाठी सात जेसीबी मशीन, सात टिपर, दोन पोकलेन, पंचवीस कामगार अविरत कार्यरत असल्याची माहिती उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव यांनी दिली. यासाठी अभियंता संजय शिंदे, नीलेश कोहळे, स्वप्नील ढवण, एस. आर. गोरे, उत्तम भांदिर्गे, चंद्रकांत भांदिर्गे, अमजद पठाण, संतोष पवार, पंचायत समितीचे बांधकाम अभियंता एम. जी. पवार आदी अविरत परिश्रम घेत आहेत.

Web Title: Construction department ready for smooth communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.