साताऱ्यात रचना २०१५ बांधकाम विषयक प्रदर्शन

By Admin | Published: February 1, 2015 09:03 PM2015-02-01T21:03:49+5:302015-02-02T00:09:03+5:30

बिल्डर्स असोसिएशन : मंडप उभारणी; दि. १४ पासून प्रारंभ

Construction work in Satara 2015 | साताऱ्यात रचना २०१५ बांधकाम विषयक प्रदर्शन

साताऱ्यात रचना २०१५ बांधकाम विषयक प्रदर्शन

Next

सातारा : पश्चिम महाराष्ट्राचे आकर्षण असणाऱ्या बांधकामविषयक ‘रचना २०१५’ या प्रदर्शनाच्या भव्य मंडप व स्टॉल उभारणीचा प्रारंभ बिल्डर्स असोसिएशन, सातारा शाखेचे अध्यक्ष रामदास जगताप यांच्या हस्ते व असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांच्या उपस्थितीत झाले. येथील जिल्हा परिषद मैदानावर दि. १४ पासून हे प्रदर्शन भरणार आहे. रामदास जगताप म्हणाले, ‘पुणे-मुंबईच्या तोडीस तोड रचना हे प्रदर्शन बिल्डर्स असोसिएशन आयोजित करते. यंदाच्या वर्षी रचना प्रदर्शनातून बदलते सातारा, विकसित होणारे सातारा, ही सातारची ओळख संपूर्ण राज्याला या प्रदर्शनाद्वारे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या दिग्गजांपासून ते आपले घर हे स्वप्न बाळगणाऱ्या सामान्य माणसासाठी हे प्रदर्शन म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. गृहप्रकल्पांचे एकाच ठिकाणी विविध पर्याय बघण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. साताऱ्यात मध्यमवर्गीयांना आवाक्यात असणाऱ्या किमतीत सदनिका उपलब्ध आहेत. बांधकाम तंत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, अत्याधुनिक पद्धती यामुळे नागरिकांना त्यांच्या राहत्या शहरात विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. मागील सात वर्षांचा अनुभवव वाढता प्रतिसाद पाहून या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनात अनेक रिअल इस्टेट व्यावसायिक आणि बांधकाम व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या सातारा व अन्य जिल्ह्यातील कंपन्या सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी)

गृह कर्जाचे पर्याय...
या प्रदर्शनात बांधकाम प्रकल्पांबरोबरच गृहसजावट, कन्स्ट्रक्शन मशिनरी, फर्निचर, सोलर सिस्टिम, गॅस गिझर, किचन अ‍ॅक्सेसरीज यासारखे विविध आकर्षक स्टॉल बघायला मिळतील. प्रदर्शनात एकूण १०० स्टॉल्स आहेत. खवैय्यांसाठी फूड मॉलची व्यवस्था प्रदर्शनस्थळी केली आहे. गृह कर्जाचे आकर्षक पर्याय या प्रदर्शनाच्या वेळेत लोकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.

Web Title: Construction work in Satara 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.