ग्राहकांनी डिजिटल प्रणालीचा वापर करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:28+5:302021-07-15T04:27:28+5:30
वाई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख व हक्काची अर्थवाहिनी आहे. आर्थिक समावेशिकरण योजनेंतर्गत बँकेने ...
वाई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रमुख व हक्काची अर्थवाहिनी आहे. आर्थिक समावेशिकरण योजनेंतर्गत बँकेने आपल्या सर्व ग्राहक व खातेदारांसाठी डिजिटल साक्षरता कॅम्पचे आयोजन केले असून, या सर्व बँकिंग सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाईचे विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे यांनी केले आहे.
जिल्हा सहकारी बँकेच्या आर्थिक समावेशिकरण योजनेंतर्गत आर्थिक व डिजिटल साक्षरता कॅम्प ओझर्डे (ता. वाई ) शाखेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मांढरे बोलत होते. यावेळी बँकेचे शाखाप्रमुख पुरुषोत्तम डेरे, विकास अधिकारी रामदास ईबत्ती, रवींद्र भिलारे, सोनाली शिर्के, संदीप चव्हाण, अनिल जाधव, सोमनाथ जाधव, सचिव अमोल पिसाळ, शंकर हेरकळ, सुनील राजपुरे, संदीप गायकवाड, धनसिंग भोसले तसेच बँकेचे खातेदार उपस्थित होते.
यावेळी विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे म्हणाले, जिल्ह्यातील ग्राम पातळीवर कार्यरत असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या माध्यमातून विविध कर्ज योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जातो. सध्याच्या संगणकीय युगात शेतकरी बांधवांनी डिजिटल ज्ञान आत्मसात करून डिजिटल बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करणे गरजेचे आहे. बँकेच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रो एटीएम मशीन, रुपये कार्ड, केसीसी कार्ड, युटीआय डिजिटल बँकिंगचा लाभ घेऊन सुरक्षित आर्थिक व्यवहार करावेत.