संपर्कामुळे होत नाही म्युकरमायकोसिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:28 AM2021-05-28T04:28:51+5:302021-05-28T04:28:51+5:30

: वैद्यकीय सावधानता आवश्यक स्टार : ७५४ लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या आजारात स्टेरॉईडचा अनियंत्रित, चुकीच्या मात्रेमध्ये आणि ...

Contact does not cause myocardial infarction | संपर्कामुळे होत नाही म्युकरमायकोसिस

संपर्कामुळे होत नाही म्युकरमायकोसिस

Next

: वैद्यकीय सावधानता आवश्यक

स्टार : ७५४

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या आजारात स्टेरॉईडचा अनियंत्रित, चुकीच्या मात्रेमध्ये आणि अनिर्बंध काळासाठी वापर झाल्याने म्युकरमायकोसिसचा धोका वाढू लागला आहे. हा आजार संपर्कामुळे नाही तर कमकुवत झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे वाढतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

स्टेरॉईडचा वापर कधी केला जावा याचे नियम ठरलेले आहेत. कोविड १९ आजारात विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारशक्ती ज्या पद्धतीने विषाणूशी वागते त्यानुसार रुग्णाला किती प्रमाणात स्टेरॉईड द्यावं हे ठरतं. सुरुवातीला फुप्फुसाला व नंतर सर्व अवयवांमध्ये कार्यक्षमेतेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. मात्र, आजारात रुग्णांची लक्षणे वाढल्याबरोबर स्टेरॉईडचा वापर पाच ते सात दिवसांसाठी केल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० ते ८० टक़्के वाढते. स्टेरॉईडच्या वापराने रक्तातील साखरेवर झालेला परिणाम म्हणून ती वाढलेली दिसते, असं मधुमेहतज्ज्ञ सांगतात. त्यांचा सल्ला घेऊन तीन वेळेला तपासणी करून ते प्रमाण २०० च्या खाली ठेवल्यास म्युकरचा त्रास होत नाही. रेमडेसिविर, टोसिझूमॅब आणि पॅव्हिपिराविर यांसारखी प्रायोगिक औषधेही याला कारणीभूत असू शकतात, असे समजण्यास वाव असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

मधुमेह, कॅन्सर असणाऱ्या ज्या रुग्णांनी कोविडवर मात केली आहे, त्या रुग्णांना पुढे काही महिने धूळ आणि दमट वातावरणात न ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत. भरपूर प्रकाश असणारी आणि स्वच्छ खोली हे त्यांचे राहण्याचे ठिकाण असावे, असेही ते सांगतात. म्युकरमायकोसिस हा बरा होणारा आजार आहे. फक्त वेळेवर निदान आणि उपचार ही त्याची महत्त्वाची सूची आहे, इतकंच.

चौकट :

रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने फंगसचे आजारात रूपांतर

म्युकर मायकोसिसमधील फंगस हा खरे तर वातावरणातील ‘युबिकोटस’ म्हणजे सर्व ठिकाणी, सर्व वेळेवर उपस्थित असलेला फंगस आहे. रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे या फंगसचे आजारात रूपांतर होते. अशा प्रकारच्या केसेस यापूर्वी कर्करोग, एचआयव्ही, अवयव प्रत्यारोपण रुग्ण, अ‍ॅनिमियाच्या रुग्णात पाहायला मिळतात. त्यामुळे स्टेरॉईडच्या वापराने म्युकरमायकोसिस वाढले असे म्हणणे अर्धसत्यासारखे आहे.

कोट :

कोणत्याही गोष्टीचा अतिवापर धोकादायक असतो, तसाच तो स्टेरॉईडसच्या बाबतीतही आहे. वेळेवर निदान आणि उपचार झाले तर म्युकरमायकोसिसमध्ये गंभीर होत जाणारी गुंतागुंत टाळता येते.

- डॉ. चंद्रशेखर घोरपडे, सातारा

रोगप्रतिकारकशक्ती कमी असणाऱ्या आणि मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. आयसीयूमध्ये प्रदीर्घ काळाच्या उपचारांमुळेही म्युकरचा त्रास होऊ शकतो.

- डॉ. उदयराज फडतरे, सातारा

म्युकरमायकोसिस हा कोविडपश्चात होणारा बुरशीजन्य आजार आहे. म्युकरमायकोसिस हा संपर्कात येण्याने होणारा संसर्गजन्य आजार नाही. ऑक्सिजन मास्कचा वापर करताना तो स्वच्छ नसेल तर बुरशी वाढण्याची शक्यता आहे.

- डॉ. सुरभी वखारिया, सातारा

पॉइंटर

म्युकरमायकोसिसचे जिल्ह्यातील रुग्ण : ५२

मृत्यू : ४

Web Title: Contact does not cause myocardial infarction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.