खिंडवाडीजवळील अपघातात कंटेनर चालक जागीच ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 03:33 PM2017-10-02T15:33:34+5:302017-10-02T15:40:05+5:30

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (सातारा) जवळ भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकून नाल्यात गेल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीस काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

Container driver killed in the accident near Khindwadi | खिंडवाडीजवळील अपघातात कंटेनर चालक जागीच ठार 

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (सातारा) जवळ कंटेनर दुभाजकाला धडकून चालक ठार झाला. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर एका बाजुला करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

Next
ठळक मुद्देपुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस अडथळा दुभाजकाला धडक देऊन नाल्यात मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत क्रेनच्या सहाय्याने कंटेनर एका बाजुला सुरक्षित उभा केला

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडी (सातारा) जवळ भरधाव कंटेनर दुभाजकाला धडकून नाल्यात गेल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. तर अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीस काहीकाळ अडथळा निर्माण झाला होता. सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली.


याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास नवीन ट्रॅक्टर घेवून कंटेनर सातारा बाजुने कºहाडकडे चालला होता. सातारा शहराजवळील खिंडवाडीतील चिंध्या पिरसमोर भरधाव असणाºया कंटेनरची उजव्या बाजुच्या दुभाजकाला जोरात धडक बसली. त्यामुळे कंटेनरचे तोंड डाव्या बाजुला वळून नाल्यात गेले.

या जोराच्या धडकेमुळे चालक नेमचंद रामखिलावन (वय ४५, रा. दिल्ली) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. त्यानंतर त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. तसेच क्रेनच्या सहाय्याने कंटेनर एका बाजुला सुरक्षित उभा केला. सातारा शहर पोलिस  अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Container driver killed in the accident near Khindwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.