साखरवाडी कारखान्याचे दूषित पाणी ओढ्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:14+5:302021-03-13T05:12:14+5:30

जिंती : साखरवाडी (ता. फलटण) येथे असलेल्या कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त ...

Contaminated water of Sakharwadi factory in the stream ... | साखरवाडी कारखान्याचे दूषित पाणी ओढ्यात...

साखरवाडी कारखान्याचे दूषित पाणी ओढ्यात...

Next

जिंती : साखरवाडी (ता. फलटण) येथे असलेल्या कारखान्याचे रसायन व मळीमिश्रित सांडपाणी थेट कारखान्याजवळील ओढ्यामध्ये सोडण्यात आल्याने पाणी दुर्गंधीयुक्त झाले आहे. या पाण्यामुळे खालच्या भागातील गावे-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्यातील मासे व इतर जलचरही मृतावस्थेत आढळून येत आहेत. हा ओढा वाड्या-वस्तीवर जात आहे कारखान्याच्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषित होत आहे.

साखरवाडी व पिंपळवाडी गावातून जाणारा हा ओढा पाण्याचा एक स्रोत म्हणून वापरला जातो कारखान्याचे सांडपाणी सोडण्यात आले असून, हे पाणी मळीमिश्रित व रसायनयुक्त आहे. जोशी वस्ती, पिंपळवाडी येथील वाडी-वस्तीमधून गावांमधून ओढ्याचे पाणी वाहत असते. वारंवार सांडपाणी ओढ्यात सोडले जात असून, सुरुवातीला कमी पाणी य़ेत असल्याने ग्रामस्थांना त्याचा त्रास जाणवत नव्हता. यंदा कारखान्याचे गाळप सुरू झाल्यापासून दोन महिन्यांपासून ओढा प्रदूषित झाला आहे. रसायनामुळे पाण्यावर पांढरा फेस आला आहे. पाणी काळसर दिसून येते आहे. सुमारे १ ते २ किलोमीटर परिसरात पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तसेच हे खराब पाणी विहिरीत उतरले असून, शेतीसाठी असलेल्या विहिरीमधील पाणी दूषित झालेले आहे. पिंपळवाडी गावाजवळील ओढ्यातील पाण्यात हे दूषित पाणी मिसळत आहे. नदीतील जलचर, शेती, ग्रामस्थ या सर्वांचे आरोग्य धोक्यात आल्याची ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली आहे.

कारखान्याच्या खराब पाण्याचा गावाला त्रास होत आहे. तसेच कारखान्याच्या डिस्टिलरीच्या सांडपाण्याचे नियोजन दूषित पाण्यावर

प्रक्रिया करण्याची मागणी केली होती. त्यावेळी कारखान्याकडून सर्व उपाययोजना केल्या जातील, असेही कारखाना प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

चौकट...

ओढा पूर्णपणे दूषित...

गेल्यावर्षी दूषित पाण्याचा हा त्रास जाणवला नाही. परंतु या गाळप हंगामामध्ये सांडपाण्याचा जास्त त्रास जाणवत आहे. पिंपळवाडी ओढ्यात कारखान्याचे खराब पाणी येत असल्याने ओढा पूर्णपणे दूषित झाला आहे. त्य़ामुळे ग्रामस्थांचे, जनावरांचे, शेती आरोग्य धोक्यात आले आहे. भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारखान्याने त्वरित हे सांडपाणी सोडणे थांबविले पाहिजे. प्रशासनाने व सरकारी यंत्रणांनी दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो आहे...

१२जिंती०१/०२

Web Title: Contaminated water of Sakharwadi factory in the stream ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.