साताऱ्यात पावसाची संततधार, बाजारपेठेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:07 PM2020-06-18T17:07:11+5:302020-06-18T17:09:31+5:30

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पश्चिम भागातील वाई, महाबळेश्वर, कास, बामणोली परिसरात गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. डोंगरी भागात पावसाची संततधार सुरू असून, साताºयात दिवसभर पाऊस पडत आहे. त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून, सातारकरांनी घरात बसणेच पसंत केले. ​​​​​​​

Continuous rains in Satara, impact on the market | साताऱ्यात पावसाची संततधार, बाजारपेठेवर परिणाम

साताऱ्यात पावसाची संततधार, बाजारपेठेवर परिणाम

Next
ठळक मुद्देसाताऱ्यात पावसाची संततधार, बाजारपेठेवर परिणाम डोंगरीभागात पावसाचा जोर वाढलेला

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह पश्चिम भागातील वाई, महाबळेश्वर, कास, बामणोली परिसरात गुरुवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. डोंगरी भागात पावसाची संततधार सुरू असून, साताºयात दिवसभर पाऊस पडत आहे. त्याचा बाजारपेठेवर परिणाम झाला असून, सातारकरांनी घरात बसणेच पसंत केले.

सातारा अन् पावसाचे जवळचे नाते आहे. सातारकर पहिल्या पावसात नेहमीच कास, बामणोली परिसरात फिरायला जात असतात; पण यंदा कोरोनाचे संकट असल्याने अनेकांनी फिरायला जाणे टाळले आहे.

शहरात गुरुवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. हा पाऊस मुरणारा असल्याने भूजल पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आटलेल्या कूपनलिकांना पाणी वाढले आहे. कास-बामणोली परिसरात पडत असलेल्या पावसामुळे कास तलावातील पाणी साठण्यात झपाट्याने वाढ होत आहे. तलावात सध्या साडेपंधरा फूट पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे साताऱ्यावरील पाणीटंचाईचे संकट दूर झाले आहे.

कोयनेत ६७ मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत कोयना येथे ६७, नवजा ५८, महाबळेश्वरमध्ये २३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणात ३३.२७ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरणात ६ हजार ६६७ क्यूसेक आवक सुरू आहे. धरणातून २,१११ क्यूसेक विसर्ग सुरू आहे.

Web Title: Continuous rains in Satara, impact on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.