साहित्य निर्मितीत मराठी भाषेचे योगदान मोलाचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:12 AM2021-03-04T05:12:20+5:302021-03-04T05:12:20+5:30
महाबळेश्वर : ‘मराठी ही भारतातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. या भाषेने साहित्यनिर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. या भाषेची महती ...
महाबळेश्वर : ‘मराठी ही भारतातील प्राचीन भाषांपैकी एक आहे. या भाषेने साहित्यनिर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. या भाषेची महती सांगावी तेवढी कमीच आहे,’ असे उद्गार महाबळेश्वर येथे गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सुधाकर शिंदे यांनी काढले.
महाबळेश्वर आगारात कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आणि मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रा. सुधाकर शिंदे म्हणाले, ‘मराठी ही भारतातील अधिकृत बावीस भाषांपैकी एक असून, तिला प्राचीन इतिहास आहे. ही भाषा महाराष्ट्राची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. भारतात मराठी भाषिकांची संख्या नऊ कोटींच्या घरात आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे महत्त्व त्यांच्या साहित्यातही विशद केले आहे. साहित्य निर्मिती मराठीने दिलेले योगदान अमूल्य असे आहे.
यावेळी बसस्थानकातील प्रवाशांना आगार व्यवस्थानाकडून गुलाबपुष्प देण्यात आले. यावेळी आगारप्रमुख नामदेव तपंगे, सहायक कार्यशाळा अधीक्षक रोहिदास खुटवड, वरिष्ठ लिपिक महेश शिंदे, संतोष शिंदे, विकास कांबळे, वाहतूक नियंत्रक प्रदीप बाबर, एकनाथ माळी, अजित जमदाडे, वीनिता साळवेकर, दिप्ती भिलारे, एच. आर. अवघडे आदी उपस्थित होते.
फोटो : ०२ महाबळेश्वर
महाबळेश्वर आगाराच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नामदेव पतंगे यांच्या हस्ते प्रा. सुधाकर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.