वाई येथे हॉस्टेलचे कोविड केअर सेंटरमध्ये रूपांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:05+5:302021-05-04T04:18:05+5:30
रुग्णांची हेळसांड होऊ नये, म्हणून सोईसुविधा वाढविल्या जात आहेत. वाई येथील किसन वीर महाविद्यालयातील मुलांचे व मुलींच्या ...
रुग्णांची हेळसांड होऊ नये, म्हणून सोईसुविधा वाढविल्या जात आहेत. वाई येथील किसन वीर महाविद्यालयातील मुलांचे व मुलींच्या वसतिगृहात प्रशासनाच्या माध्यमातून वाई तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण यांच्यासाठी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या कोरोना केअर सेंटरची क्षमता दीडशे रुग्णांची असून, सद्यस्थितीत पन्नास रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आवश्यकतेनुसार ही क्षमता वाढविण्यात येणार आहे. कोरोना केअर सेंटरमध्ये वाई तालुक्यातील होम आयसोलेशनची सुविधा नसलेले, तसेच ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत, अशा रुग्णांची निवास, भोजन, तसेच उपचाराची व्यवस्था होणार आहे.
या सेंटरचे प्रमुख म्हणून डॉ.देवेंद्र यादव हे काम पाहणार आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी संगीता राजापूरकर व तहसीलदार रणजीत भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदीप यादव यांनी दिली.