पवारांच्या भेटीत साताऱ्याबाबत डावपेच निश्चित -: शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 11:57 PM2019-08-01T23:57:28+5:302019-08-01T23:58:28+5:30

सलग १५ वर्षे आमदार राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साताºयाच्या बालेकिल्ल्याला मोठा दणका बसल्याने शरद पवार यांनी याची मोठी दखल घेतली आहे.

Conviction fixed on Satara during Pawar's visit | पवारांच्या भेटीत साताऱ्याबाबत डावपेच निश्चित -: शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक भेटीला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गुरुवारी सातारा येथील विश्रामगृहावरून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्याभोवती गराडा घातला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.

googlenewsNext
ठळक मुद्देकल्पनाराजे, दमयंतीराजेंच्या नावाबाबत विश्रामगृहावर खलबते

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या सातारा भेटीत सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबतचा निर्णय निश्चित केला असून कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले तसेच आमदार शशिकांत शिंदे, ऋषिकांत शिंदे यांच्या उमेदवारीबाबत खलबते केली. तसेच पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याबाबतची चर्चाही झाली.

सलग १५ वर्षे आमदार राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. साताºयाच्या बालेकिल्ल्याला मोठा दणका बसल्याने शरद पवार यांनी याची मोठी दखल घेतली आहे. राजारामनगर, (ता. वाळवा, जि. सांगली) येथे राजारामबापू जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी खा. पवार गुरुवारी जाणार होते. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ते साताºयात मुक्कामी थांबले होते. त्यांच्या मुक्कामामुळे बुधवारी रात्री व गुरुवारी दिवसभर विश्रामगृहावर अनेकांचा राबता राहिला.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांना विचारूनच घेणार असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. शुक्रवारी पुणे येथे या दोन नेत्यांची बैठक होणार असून, येत्या आठ दिवसांत भाजपचे संभाव्य उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याविरोधात राष्ट्रवादीतून कोण लढणार? याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी बुधवारी रात्री शरद पवार यांचे विश्रामगृहावर स्वागत केले. त्यानंतर रात्री कल्पनाराजे भोसले यांनी पवारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उदयनराजे समर्थक सुनील काटकर होते. यावेळी सातारा-जावळीच्या उमेदवारीच्या अनुषंगाने चर्चा झाली. गुरुवारी तर सकाळपासूनच अनेक तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी विश्रामगृहावर येऊन पवारांशी चर्चा केली. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, सुनील माने, सत्यजित पाटणकर, राजेश पवार, राजाभाऊ शेलार, संजय देसाई, अविनाश मोहिते आदींनी भेट घेतली.

भाजप प्रवेशानंतर शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागतासाठी गेलेले राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सतीश चव्हाण, माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील हे गुरुवारी सकाळी पवारांच्या भेटीसाठी विश्रामगृहावर आले होते.


दोन दिवसांतील घडामोडी... जयवंत भोसलेंची पवारांशी चर्चा
साताऱ्यातील शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक व कोरेगाव तालुक्यातून जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले जयवंत भोसले यांनी गुरुवारी खासदार शरद पवार यांची साताºयातील शासकीय विश्रामगृहावर भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पवारांशी गुजगोष्टीही केल्याची चर्चा आहे.

कोरेगावातून अनेक पर्यायांचा धांडोळा...
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार शशिकांत शिंदे यांचे सातारा-जावळीत पुनर्वसन करायचे झाल्यास कोरेगावातून कोण लढणार? याचा धांडोळा पवारांनी आपल्या सातारा दौºयात घेतला. कोरेगावातून पवारांचे नातू रोहित पवार यांचे नाव तर चर्चेत आहेच. या व्यतिरिक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नितीन पाटील यांच्या नावाबाबतही राष्ट्रवादीमध्ये खल सुरू झाला आहे.

बँकेतील अविश्वासाबाबत जोरदार चर्चा
जिल्हा मध्यवर्ती बँकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. बँकेचे अध्यक्ष असणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये दाखल झाले असल्याने आता जिल्हा बँकेतील त्यांचे अध्यक्षपद अडचणीत आणण्याच्या खेळी सुरू झाल्या आहेत. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना पदच्युत करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा गुरुवारी सुरू होती.

काय होऊ शकतं?
-वाई, कºहाड उत्तर, फलटण, कोरेगाव या चार मतदारसंघांत विद्यमान आमदारांनाच उमेदवारी
-सातारा-जावळीतून उमेदवाराचा शोध
-राजघराण्यातीलच एखाद्या व्यक्तीला संधी
-शशिकांत शिंदेंना सातारा-जावळीतून लढण्याचा आग्रह

 

Web Title: Conviction fixed on Satara during Pawar's visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.