बॉम्बच्या अफवेमुळे कोयना एक्सप्रेस थांबविली; तिघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 08:55 PM2019-03-27T20:55:47+5:302019-03-27T20:57:17+5:30
कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे काही वेळातच माहुली येथील रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविण्यात आली. तातडीने बॉम्बशोधक पथकाद्वारे रेल्वेमध्ये
सातारा : कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आल्यामुळे काही वेळातच माहुली येथील रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविण्यात आली. तातडीने बॉम्बशोधक पथकाद्वारे रेल्वेमध्ये तपासणीला सुरुवात करण्यात आली. प्रवाशांच्या बॅगांचीही कसून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यामध्ये काहीच न सापडल्याने रेल्वे पुढील प्रवासासाठी सोडण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी, मुंबईहून कोल्हापूरकडे येणाऱ्या कोयना एक्सप्रेसमध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन सातारा पोलीस मुख्यालयात आल्यानंतर पोलिसांनी धावपळ करत संपूर्ण रेल्वेची तपासणी केली. मात्र, त्यामध्ये काहीच आढळून आले नाही. त्यामुळे रेल्वेची तपासणी करून रेल्वे पुढे सोडण्यात आली. जेजुरीमध्ये प्रवास करताना काही प्रवाशांनी शेजारच्यांचे बोलणे ऐकून सातारा मुख्यालयात रेल्वेत बॉम्ब ठेवला असल्याचा फोन केला. त्यामुळे माहुली रेल्वे स्थानकात रेल्वे थांबवून चौकशी करण्यात आली. तसेच जेजुरी पोलिसांनी फोन करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले आहे.