कोयनेत २४ तासांत ५ टीएमसी पाणी वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:50 PM2019-07-07T23:50:47+5:302019-07-07T23:50:52+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात दरड कोसळली आहे. तसेच ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पाटण तालुक्यातील गुजरवाडी घाटात दरड कोसळली आहे. तसेच अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. कºहाड तालुक्यातील गोटेवाडीत भराव वाहिला. कास, बामणोली परिसरात दरड कोसळल्याने रस्ता व शेतीचे नुकसान झाले. साताऱ्यातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. तर शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरला पावसाने झोडपून काढले, त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली. कोयना धरणात गेल्या २४ तासांत जवळपास ५ टीएमसी पाणीसाठा वाढला, तर सततच्या या पावसामुळे कास, बामणोली, तापोळा, पाटण, ठोसेघर या भागात ओढे, नाले खळाळू लागले आहेत, त्यामुळे नुकसानीच्या घटनाही घडू लागल्यात. कास परिसरात एका रस्त्यावर डोंगरावरील दरड कोसळली. तर सततच्या पावसामुळे पश्चिम भागात शेतीचे नुकसान होत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामेही खोळंबली आहेत.
सातारा शहर व परिसरात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीतपणा आला आहे. प्रामुख्याने
सदर बझार व गोडोली या भागाला
पावसाचा मोठा फटका बसला असून, घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
पाटण तालुक्यातील विविध भागांत शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाटण ते मोरगिरी जाणाºया रस्त्यावर कालव्याचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाटण-तारळे मार्गावरील गुजरवाडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक बंद झालीय.
गोटेवाडी (ता. कºहाड) येथील बंधाºयावर रस्त्यासाठी टाकलेला भराव रविवारी दुपारी पावसाच्या पाण्याने वाहून गेला. त्यामुळे बंधाºयात साठलेले पाणी आसपासच्या शेतात घुसून नुकसान झाले. कास तलावाकडून पुढे कास गाव व बामणोलीकडे जाणाºया रस्त्याच्या दोन्ही बाजूस सुमारे पंचवीस फूट रुंद व सत्तर फूट खोल खोदकाम झाले होते. याच ठिकाणी रस्ता खचल्याने बामणोली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर कोळघरजवळ दरड कोसळल्याने शेती व रस्त्याचे नुकसान झाले. कास पठार परिसरात सतत पाऊस कोसळत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.