कोरोनात एकमेकांना सहकार्य करावे : संजीवराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:11+5:302021-05-14T04:39:11+5:30
वाठार निंबाळकर : ‘दुष्काळी परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक बांधीलकी जपली गेली. तशीच सामाजिक बांधीलकी कोरोना साथीमध्ये ग्रामस्थांनी ठेवून एकमेकांना सहकार्य ...
वाठार निंबाळकर : ‘दुष्काळी परिस्थितीत ज्याप्रमाणे सामाजिक बांधीलकी जपली गेली. तशीच सामाजिक बांधीलकी कोरोना साथीमध्ये ग्रामस्थांनी ठेवून एकमेकांना सहकार्य करावे,’ असे आवाहन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
चोधरवाडी (ता. फलटण) येथील लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. होम आयसोलेशन सेंटरसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल विठ्ठल विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संस्थापक चेअरमन मानसिंगराव चौधरी, तसेच होम आयसोलेशन विलगीकरण कक्ष सेंटरसाठी चौधरवाडी कोरोना सहायता निधीमध्ये सहभाग घेतलेल्या चौधरवाडी ग्रामस्थ, शरद जाधव, सिमेंट पाईप यांच्या सौजन्याने कोरोना सेंटरसाठी शौचालय, तुकाराम कोकाटे यांच्याकडून सात बेडची उपलब्धता करून दिली. चौधरवाडी सरपंच यांच्याकडून पाच हजार रुपये, दत्तूपंत खेत्रे यांच्याकडून पाच हजार रुपये, दत्तात्रय घाडगे यांच्याकडून तीन हजार रुपये, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार बनसोडे यांच्याकडून कोरोना सेंटरला जेसीबीच्या स्वरूपात मदत, पप्पू मेहत्रे, सर्जेराव ढवळे, नंदकुमार भगत व नवनाथ पवार यांनी मदत केली आहे.