कोरोना चाचण्यांसाठी सहकार्य आवश्यक : चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:18+5:302021-06-18T04:27:18+5:30
किडगाव : सातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमण कमी होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील कोरोना चाचणीस सहकार्य करण्याची गरज आहे, ...
किडगाव : सातारा जिल्ह्यातील कोरोना संक्रमण कमी होत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील कोरोना चाचणीस सहकार्य करण्याची गरज आहे, असे आवाहन सातारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांनी केले.
कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्र व धावडशी उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत किडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना चाचणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सुवर्णा चव्हाण म्हणाल्या, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सातारा जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. मात्र, प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या उपाय योजनेला लोकांनी प्रतिसाद दिल्यानेच जिल्ह्यातील रुग्णांची आकडेवारी कमी झालेली आहे. सातारा तालुक्यात आरोग्य यंत्रणेमार्फत गावोगावी कोरोना चाचणीची शिबिरे आयोजित केली जात असून, यासाठी लोकांनी स्वतःहून पुढे आले पाहिजे. आजार लपविता कामा नये आणि ताबडतोब उपचार घेतले पाहिजेत, तरच या रोगाला आपण थांबवू शकतो. ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष स्थापन करून येथील लोकांची सोय केल्याबद्दल चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.