कोरेगाव : रक्कम मोजत असणाऱ्या मटकाबुकींकडून नऊ लाखांची रोखड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 12:28 PM2018-10-02T12:28:18+5:302018-10-02T12:29:04+5:30
कोरेगाव येथील एका मटका अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात नऊ बुकींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून
कोरेगाव : कोरेगाव येथील एका मटका अड्ड्यावर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात नऊ बुकींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ९ लाख ३२ हजार रुपयांची रोखड जप्त करण्यात आली. तसेच तीन दुचाकी व १८ मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास दिवसभरात आलेली रक्कम मोजत असताना ही कारवाई करण्यात आली.
कोरेगाव येथील एक बंदिस्त घरात शहर व परिसरात अवैद्य मटका घेणारे जवळपास दहा मटकाबुकी दिवसभरात घेतलेली रक्कम मोजत असल्याची माहिती कोरेगावच्या पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास कारवाई केली. अवघ्या चार पोलिसांच्या पथकाला सोबत घेऊन घटनास्थळावर धाडशी छापा टाकला. तेथे दहा मटका बुकी हजर होते. मात्र, छाप्याची कुणकुण लागताच सावध झालेले दोघे जवळच उभ्या असणाºया दुचाकीवरुन पसार झाले. कारवाईत तब्बल ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांची रोखड हस्तगत करण्यात आली.