साताऱ्यातील कपडे व्यापाऱ्यावर कॉपीराईटचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:21 PM2018-04-18T12:21:53+5:302018-04-18T12:21:53+5:30
मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : मफतलाल कंपनीची परवानगी न घेता विद्यार्थ्यांच्या गणवेशावर बनावट लेबल लावून विक्री केल्याप्रकरणी साताऱ्यातील सिटीसेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांच्यावर फसवणूक व कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सदाशिव पेठेतील सिटी सेंटरचे मालक मोहित शांतीलाल कटारिया यांनी मफतलाल कंपनीच्या परवानगीशिवाय पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या मुला-मुलींच्या शर्ट व स्कर्टवर मफतलाल असे बनावट लेबल लावले.
त्या कपड्यांची विक्री करून कंपनीच्या ग्राहकांची व मफतलाल कंपनीची आर्थिक फसवणूक केली. तसेच त्यांच्या मालकीच्या दुकानात ३ लाख १० हजार ५६० रुपये किमतीचा माल मिळून आला.
याप्रकरणी कंपनीचे अधिकारी कमलेशकुमार कामात सिंग (रा. वसई) यांनी शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ करीत आहेत.