दहिवडीला कोरोनाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:18 AM2021-02-28T05:18:16+5:302021-02-28T05:18:16+5:30

ग्राऊंड रिपोर्ट दहिवडी शहरात आतापर्यंत ५०० हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या झाली असून दुसऱ्या टप्प्यातही कोरोनाने दीडशतकाकडे वाटचाल केली ...

Corolla to Dahiwadi | दहिवडीला कोरोनाचा विळखा

दहिवडीला कोरोनाचा विळखा

Next

ग्राऊंड रिपोर्ट

दहिवडी

शहरात आतापर्यंत ५०० हून अधिक कोरोनाबाधितांची संख्या झाली असून दुसऱ्या टप्प्यातही कोरोनाने दीडशतकाकडे वाटचाल केली आहे. पहिल्या टप्प्यात दहिवडी शहर नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनाला यश आले होते. पण, फेब्रुवारी महिन्यात मात्र दहिवडी शहराला कोरोनाने विळखा दिला आहे. आजही शंभरपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. तर, शनिवारी पुन्हा नव्याने १० रुग्ण बाधित आढळले आहेत. ही साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध हाच पर्याय आहे. जनतेनेही मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर याचा नियमित वापर केला पाहिजे.

कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू

दहिवडी शहराला कोरोनाचा घट्ट विळखा बसला असून यामध्ये एका डॉक्टरांचा मृत्यू झाला होता तर आजही डॉक्टर मेडिकल व्यापारी कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. दहिवडीत लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होत आहे.

अत्यावश्यक सेवा घरपोच

अत्यावश्यक सेवा पुरविणारी किराणा दूध, भाजीपाला ही दुकानेही बंद असून सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान ऑर्डर घेऊन घरपोच सेवा दिली जात आहे. कोरोना योद्धे, स्वयंसेवक, दुकानदार विक्रते यांना ओळखपत्रे देण्यात आली आहेत.

चौकट

नियम मोडणाऱ्यांना दंड

हॉटस्पॉट असलेल्या अनेक ठिकाणचा परिसर पूर्णपणे सील केला असून मुख्य रस्ते वगळता पोलिसांनी कडक निर्बध लावले असून नगरपंचायतीच्या सहाय्याने ५ लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.

चौकट

घर टू घर सर्व्हे

लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण दहिवडीचा सर्व्हे सुरू असून आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी शिक्षिका यांची २५ पथके तयार केली असून यावर ८ सुपरवायझर नेमले आहेत. घर टू घर सर्व्हे सुरू आहे. त्याचबरोबर ऑनलाईन व्हॅनही मदतीला ठेवली आहे.

कोरोना चाचणीसाठी फिरती व्हॅन

नागरिकए व्यापारी यांना ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार मिळावा यासाठी सिद्धनाथ मंदिर, चावडी चौक अंगणवाडी, सावरकर अभ्यासिका, आंधळी पुनर्वसन शाळा या चार ठिकाणी आरटीपीसीआर टेस्टची सुविधा केली असून फिरती व्हॅनही ठेवण्यात आली आहे. शनिवारी १२८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांनी दिली.

रुग्ण वाढताहेत खबरदारी आवश्यक

दहिवडीत गांधीनगर, बाजारपटांगण, चावडी चौक, गणेश पेठ, पोस्ट परिसर, कटपाळे वस्ती, सरकारी दवाखाना एस टी स्टँड परिसर, खताळवस्ती या ठिकाणी रुग्णवाढ होत आहे. तर तुपेवाडी परिसरावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य खात्याला यश मिळाले आहे.

कोरोनातही लोकांना मोह आवरेना

अद्यापही काही लोकांना पोलिसांची नजर चुकवून सकाळी - संध्याकाळी वॉकला जाण्याचा मोह आवरत नाही. तसेच काही बाधित रुग्ण बाहेर फिरताहेतए अशी तक्रार नागरिक करीत आहेत.

आतापर्यंत ५२४ बाधित

फेब्रवारी महिन्यात १९१ कोरोना बाधित तर आजपर्यंत ५२४ कोरोना बाधित सापडले. १२१ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यापैकी ५४ जण विविध ठिकाणी उपचार घेत असून ६७ जणांना होम आयसोलेशनवर ठेवण्यात आले आहे

फोटो - दहिवडी येथे घर टू घर सर्व्हे करताना आरोग्यविभागाचे पथक.

Web Title: Corolla to Dahiwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.