कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:43 AM2021-07-14T04:43:58+5:302021-07-14T04:43:58+5:30

मलकापूर : शहरात कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या मुला-मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. महिला व बालकल्याण ...

Corona accepted the academic guardianship of those who lost guardianship | कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले

कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले

googlenewsNext

मलकापूर : शहरात कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या मुला-मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘ना. आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना’ जाहीर केली आहे. कोरोनाने अनाथ झालेल्या मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणारी ही बहुधा पहिलीच पालिका ठरली आहे.

मलकापूर पालिकेने पंधरा वर्षात विविध नाविण्यपूर्ण योजना राबवून राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थासमोर एक आदर्श ठेवला आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, स्व. भास्करराव शिंदे दिव्यांग पेन्शन योजना, गरोदर माता-बालक दत्तक योजना, चोवीस तास नळपाणीपुरवठा योजना, सांडपाणी प्रक्रिया योजना, सोलर सिटी, घनकचरा व्यवस्थापन, अशा विविध योजना शहरात सातत्याने राबवल्या जात आहेत. श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियानात दरवर्षी शहरातील ७०० ते ८०० मुलींनी लाभा घेतला आहे. या योजनेत मोफत पास व स्वतंत्र बस उपलब्ध झाल्यामुळे शहरातील मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळाले आहे. तर प्रियदर्शनी कन्यारत्न योजनेत शहरात जन्मलेल्या मुलीच्या नावावर पालिकेचा महिला व बालकल्याण विभाग आणि कराड अर्बन बँक ठराविक रक्कमेची ठेव पावती करतात. मुलगी सज्ञान झाली की तिला एक लाख रूपये मिळण्याची व्यवस्था केली आहे. या योजनेत आत्तापर्यंत शहरातील दोनशेहून अधिक मुली जन्मतःच लक्षाधिश झाल्या आहेत. तसेच शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी दर महा १ हजार पेन्शन दिली जाते. गरोदर माता बालक दत्तक योजनेतून गरोदर मातांना पौष्टिक आहार व औषधोपचार केला जातो. अशा विविध योजना शहरात सातत्याने राबवल्यामुळे मलकापूर नगरपालिका ही नाविण्यपुर्ण उपक्रमांची कार्यशाळा असुन ओळखली जाते. अशीच एक नवीन योजना पालिकेने यावर्षीपासून हाती घेतली आहे.

शहरात कोरोनामुळे पालकत्व हरवलेल्या मुला-मुलींचा प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी पालिकेने घेतली आहे. महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘ना. आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना’ नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी जाहीर केली. त्यामुळे कोरोनाने अनाथ झालेल्या मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारणारी ही पहिलीच पालिका ठरू शकते.

कोट

मलकापूर पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्नाखाली सर्व नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विविध योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. शहरातील महिला, मुली, बालक व दिव्यांगासाठी कायमस्वरूपी योजना सुरू केल्या आणि सातत्याने सुरू आहेत. त्याच पध्दतीने ‘ना. आनंदराव चव्हाण शिष्यवृत्ती योजना’ ही योजनाही कोरोना महमारीने अनाथ झालेल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी वरदान ठरेल.

- शकुंतला शिंगण

महिला व बालकल्याण सभापती, मलकापूर

Web Title: Corona accepted the academic guardianship of those who lost guardianship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.