जिल्ह्यात ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:06 PM2020-07-21T21:06:23+5:302020-07-21T21:07:39+5:30

सातारा जिल्हा आरोग्य विभागाने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ८९ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. तर सोमवारी सकाळी अँटिजन टेस्ट किटद्वारे ६ जण बाधीत रुग्ण सापडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरानंतर ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

Corona affected 95 people in the district | जिल्ह्यात ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित

जिल्ह्यात ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित

Next
ठळक मुद्देअँटिजन टेस्ट किटद्वारे ६ जण बाधीत रुग्ण सापडलेजिल्ह्यात ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा : जिल्हा आरोग्य विभागाने सोमवारी रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ८९ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले. तर सोमवारी सकाळी अँटिजन टेस्ट किटद्वारे ६ जण बाधीत रुग्ण सापडले. त्यामुळे सोमवारी रात्री उशिरानंतर ९५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.

या कोरोना बाधितांत कºहाड तालुक्यात सर्वाधिक २७ रुग्ण आढळून आले. यामध्ये कºहाड शहर ६, उंब्रजला ५, वराडे ४, मलकापूर २, कालवडे २, आगाशिवनगर २, कोळे २, कालगाव १, शामगाव १, कासारशिरंबे १, बेलवडे बुद्रुक १ असे रुग्ण स्पष्ट झाले आहेत. तर फलटण तालुक्यात नवे १७ रुग्ण आढळले. सासवड येथे १, वारेवस्ती खामगाव येथे १०, लक्ष्मीनगर फलटणमध्ये ४, लक्ष्मीवाडी साखरवाडी येथे २ असे हे प्रमाण आहे.

महाबळेश्वर तालुक्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. तालुक्यातील गोडवली येथे ८ आणि भिलारला एक रुग्ण सापडला. खटाव तालुक्यातही वडूज आणि डिस्कळला प्रत्येकी ३ आणि नेर येथे दोघेजण बाधित सापडले.

सातारा तालुक्यातील नवीन काही रुग्णांची नोंद झाली. यामध्ये सातारा शहरात ३, खिंडवाडी २, खावली १ आणि नागठाणे गणेशवाडीमधील एकाचा समावेश आहे. वाई तालुक्यात शेंदुरजणे ४ आणि बोपेगावच्या दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. पाटण तालुक्यात नेरले येथे ५ रुग्ण आढळून आले आहेत.

खंडाळा तालुक्यात शिरवळला २ आणि नायगाव येथील १ असे तिघेजण बाधित झाले आहेत. कोरेगाव तालुक्यात बनवडी आणि वाठार किरोलीत प्रत्येकी १ रुग्ण आढळला. तसेच माण तालुक्यातील दहिवडीत आणखी एका रुग्णाची भर पडली.

अँटीजन टेस्टचे रुग्ण असे :

सोमवारपासून मंगळवारी सकाळपर्यंत अँटिजन टेस्ट्सनुसार १० रुग्ण आढळून आले. यामध्ये जावळी तालुक्यातील दापवडी येथील दोघेजण, साताऱ्यातील शाहूनगरमधील २, वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील ३, सिध्दांतवाडी येथील २, वाई पोलीस लाईन १ असे हे १० बाधित आहेत.

२५५४ कोरोना बाधितांची तालुकानिहाय आकडेवारी अशी :

कऱ्हाड - ५३४, सातारा - ४१७, जावली - ३१९, वाई - ३०६, पाटण - १९९, खंडाळा - १९२, फलटण - १९१, खटाव - १३७, कोरेगाव - १११, माण - ८४ आणि महाबळेश्वर तालुका ६४.
 

Web Title: Corona affected 95 people in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.