कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढल्या चारचाकी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:40 AM2021-07-30T04:40:48+5:302021-07-30T04:40:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना महामारीमुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद होती. खासगी प्रवासी वाहनेही बंद ठेवण्यात आल्याने ...

Corona breaks passenger traffic; Four-wheelers grown in homes! | कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढल्या चारचाकी !

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरात वाढल्या चारचाकी !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना महामारीमुळे सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद होती. खासगी प्रवासी वाहनेही बंद ठेवण्यात आल्याने अनेकांचा कोंडमारा झाला. प्रवासी वाहतुकीला अचानक ‘ब्रेक’ लागल्याने अनेकांनी चारचाकी वाहने खरेदी केली आहेत.

कोरोनामुळे प्रवासी वाहतूक कमी वापरली जात आहे. स्वत:ची दुचाकी किंवा चारचाकीतून प्रवास करण्याकडे सर्वांचा कल आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री वाढली आहे. नवे अथवा जुने पण चारचाकी वाहन घरात असायलाच हवे, अशी प्रत्येकाची मानसिकता पाहायला मिळते. कोरोना काळात वाहनांची शोरुम बंद ठेवण्यात आली होती. मात्र, तरीही वाहनांचे बुकिंग मोठ्या प्रमाणावर केले गेले. अनेक शोरुममधून जुनी वाहनेदेखील मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली गेली आहेत.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) दुचाकी-चारचाकी विक्री वाढली

दुचाकी चारचाकी

२०१९ ३५८१८ ४४२७

२०२० २२२९९ ३६६४

२०२१ (जुलैपर्यंत) ३६६४ ४७५६

२) ऑटो-टॅक्सी कारची विक्री घटली

ऑटो टॅक्सीकार

२०१९ ९०४ ४४२७

२०२० ९० ३७

२०२१ (जुलैपर्यंत) १०७ ४४

३) ऑटोचालक-टॅक्सीचालक परेशान (दोन प्रतिक्रिया)

कोट..१

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून ऑटो रिक्षाचालकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. यासाठी लॉकडाऊन केल्याने रिक्षा वाहतुकीवर निर्बंध आणले गेले. पुढे पेट्रोलही वाढल्याने हा व्यवसाय करणे अवघड होऊन बसले आहे.

संभाजी पवार, रिक्षाचालक

कोट..२

शासनाने आम्हाला पॅकेज जाहीर करावे. आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रिक्षाला व्यवसाय नसल्याने रिक्षाच्या जीवावर घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा मोठा प्रश्न आहे. आता रोजचा दिवस कसा काढायचा, हा प्रश्न आहे. रिक्षा विकायचा विचार करतोय.

विजय सूर्यवंशी, रिक्षाचालक

४) म्हणून घेतली चारचाकी

कोट...१

दोन वर्षांपासून कोरोनाची महामारी सुरु आहे. अजूनही रुग्ण आढळत आहेत. आमच्या घरातील वृध्द लोकांना दवाखान्यात न्यायचे झाले तरी रिक्षा, टॅक्सी मिळत नव्हत्या. अखेर जुनी चारचाकी घेण्याचा निर्णय घेतला. वृध्दांची सोय होत आहे.

समीर कुलकर्णी

कोट..२

मला आठवड्यातून एकदा व्यवसायानिमित्त पुणे किंवा कोल्हापूरला जावे लागते. कोरोना काळात सार्वजनिक बस व्यवस्था बंद राहिली होती. तसेच आता वाहतूक सुरु झाली असली तरी कोरोनाची भीती आहे. त्यामुळे मोठी गाडी घेण्याचा निर्णय घेतला.

सतीश साळुंखे

Web Title: Corona breaks passenger traffic; Four-wheelers grown in homes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.