कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात कोरोना केअर सेंटर पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:38 AM2021-04-18T04:38:20+5:302021-04-18T04:38:20+5:30
कोरेगाव : ‘मागील काही दिवस बंद असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर पूर्ववत सुरू झाले आहे. आमदार महेश ...
कोरेगाव : ‘मागील काही दिवस बंद असलेले येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना केअर सेंटर पूर्ववत सुरू झाले आहे. आमदार महेश शिंदे यांनी घेतलेल्या तातडीच्या बैठकीनंतर शुक्रवारपासूनच सेंटर सुरु झाले,’ अशी माहिती रुग्ण कल्याण समिती सदस्य सुनील बर्गे यांनी दिली.
कोरेगाव तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्या कोणतीच सुविधा नव्हती. उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात अडचणी होत्या. ही बाब आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर, त्यांनी तत्काळ सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवून माहिती घेतली, तसेच कोरोना केअर सेंटर सुरू करण्यासाठी लागणारी सर्व साधनसामुग्री स्वत:च तत्काळ उपलब्ध करून देत, बाधितांवर उपचार सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार, बैठक संपताच कोरोना केअर सेंटर सुरूही झाले, अशी माहितीही देण्यात आली.
बैठकीस प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र जाधव, मुख्याधिकारी विजया घाडगे, प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल बर्गे, नगरसेवक जयवंत पवार, महेश बर्गे, राहुल प्र. बर्गे, निवास मेरुकर उपस्थित होते. आमदार महेश शिंदे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे कोरोनाबाधितांना दिलासा मिळाला आहे.
फोटो आहे...
......................................................................