corona cases in Satara : बाहेर फिरणाऱ्या ६० जणांची कोरोना चाचणी; १ जण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 06:09 PM2021-06-12T18:09:25+5:302021-06-12T18:11:01+5:30
corona cases in Satara : सातारा जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे मात्र इतर नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना बॉंबे रेस्टोरंन्ट चौकात थांबवून शहर पोलिसांनी घेतलेल्या कोरोना चाचणीत ६० जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर १ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
सातारा : जिल्हयात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे मात्र इतर नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहेत. अशा विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना बॉंबे रेस्टोरंन्ट चौकात थांबवून शहर पोलिसांनी घेतलेल्या कोरोना चाचणीत ६० जणांची कोरोना चाचणी केल्यानंतर १ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळला.
जिल्हयात कोरोना बाधित आकडा कमी आला असला तरी पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने अनलॉकमध्ये निर्बंध कडक आहेत. सोमवार ते शुक्रवार ९ ते २ आणि शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यात दूध, मेडिकल, खते, बी-बियाणे या दुकानांव्यतिरित इतर दुकाने बंद आहेत. मात्र, या-ना त्या कारणाने नागरिक घराबाहेर पडत आहेत.
शहर पोलिसांनी बॉंबे रेस्टोरंन्ट चौकात शनिवारी सकाळी कारवाई करत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना (अँटिजेन) टेस्ट घेण्याची धडक मोहीम राबवली. याकामी गोडोलीच्या ग्रामीण आरोग्य केंद्राची मदत घेण्यात आली. कोविड चाचणीचा धडाका सुरु करण्यात आला.
पुढे चाचणी सुरु असल्याने अनेकांनी त्याठिकाणाहून पळ काढल्याचे दिसून आले. चार जणांच्या कोरणा चाचणी केल्यानंतर त्यामध्ये एक जण कोरणा बाधित आढळून आला त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे . विनाकारण बाहेर फिरू नका असे पोलिस वारंवार सांगत आहेत मात्र तरीही काही ठिकाणी लोक रस्त्यांवर विनाकारण फिरताना आढळुन येत आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल करून कंटाळलेल्या पोलिसांनी अखेर कारवाईचा नवीन फंडा शोधून काढला. कोणाच्या दुचाकी जप्त केल्या तर काहीच्या दुचाकीतील हवा सोडली. त्यामुळे दुचाकीस्वरांना गॅरेजपर्यंत गाडी ढकलत न्यावी लागली.