कोरोनामुळे ब्रेथ अॅनालायझर धूळ खात अन् मद्यपी सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:40 AM2021-02-16T04:40:09+5:302021-02-16T04:40:09+5:30
सातारा : मद्य प्राशन केलेले वाहनचालक ओळखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडून वेळोवेळी ब्रेथ अॅनालायझर यंत्राचा वापर केला जात होता. ...
सातारा : मद्य प्राशन केलेले वाहनचालक ओळखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडून वेळोवेळी ब्रेथ अॅनालायझर यंत्राचा वापर केला जात होता. मात्र, वर्षभरापासून कोरोनामुळे हा वापर पूर्णपणे थांबला. त्यामुळे मद्यपींचे फावले असून, अशा मद्यपी वाहनधारकांना ओळखायचे कसे, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. वर्षभरापासून पोलिसांकडे २१ ब्रेथ अॅनालायझर धूळ खात पडून आहेत.
कोरोनाची महामारी सुरू झाल्यापासून ब्रेथ अॅनालायझरचा वापर करण्यावर निर्बंध आले. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील ९ ठिकाणी नाकाबंदी केली होती. मात्र, या नाकाबंदीत पोलिसांना एकही मद्यपी वाहन चालक आढळून आला नव्हता. त्याचे कारण म्हणजे ब्रेथ अॅनालायझर मशीनचा वापर झाला नाही. परंतु रस्त्याने दुचाकीवरून जाताना पोलिसांनी काहीजणांना अडवले. त्यांच्या तोंडाला दारूचा वास आल्यानंतर पोलिसांनी अशा वाहन चालकांवर कारवाई केली. मात्र, कारवाई करण्यात पोलिसांना मर्यादा येत होत्या.
चौकट :
जुलैनंतर एकाही मद्यपीवर कारवाई नाही
मार्चपासून डिसेंबरपर्यंत शहरात केवळ ११ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मार्चमध्ये ३, तर त्यानंतर मे महिन्यात ५ आणि जुलै महिन्यात ३ अशा ११ जणांवर कारवाई करण्यात आली. ऑगस्टनंतर मात्र, एकाही मद्यपीवर कारवाई झाली नाही. या काळात कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. त्यामुळे या कारवाया थंडावल्या.
कोट :
कोराना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे शासनाने ब्रेथ अॅनालायझर मशीनचा वापर करण्यास निर्बंध घातले आहेत. मात्र, तरी सुद्धा मद्यपींवर अलीकडे कारवाया सुरू करण्यात आल्या आहेत.
- विठ्ठल शेलार,
सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, सातारा
चौकट :
ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह कारवाई
जानेवारी ३८
४९
फेब्रुवारी १३
३२
मार्च ३
००
मे ५
००
जून ००
००
जुलै ३
५५
ऑगस्ट ००
सप्टेंबर ००
ऑक्टोबर ००
नोव्हेंबर ००
डिसेंबर ००
...................................
चौकट :
कोरोना काळात सर्वाधिक खरेदी
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मद्यविक्री पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र, तरी सुद्धा अनेकजण लपून छपून मद्य विक्री करत होते. अशा व्यावसायिकांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाया केल्या. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा वाईन शॉप दुकानांवर अक्षरश: रांगा लागल्या. अनेकांनी घरात स्टॉक करून ठेवला. त्यामुळे कोरोना काळात मद्य विक्रीचा खप सर्वाधिक जास्त होता.
..............................