कोरोनानंतर बदलले घराघरांतले किचन, हेल्दी पदार्थ वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:53+5:302021-06-16T04:49:53+5:30

सातारा : कोरोनाचा संसर्ग झालेले आणि संसर्ग होऊ नये या दोन्ही कारणांनी सातारकरांचे किचन आता अधिक हेल्दी झाले आहे. ...

Corona changed after Corona, Healthy food grew! | कोरोनानंतर बदलले घराघरांतले किचन, हेल्दी पदार्थ वाढले!

कोरोनानंतर बदलले घराघरांतले किचन, हेल्दी पदार्थ वाढले!

Next

सातारा : कोरोनाचा संसर्ग झालेले आणि संसर्ग होऊ नये या दोन्ही कारणांनी सातारकरांचे किचन आता अधिक हेल्दी झाले आहे. जंक फूडला गुडबाय करून अनेक घरांमध्ये देशी पदार्थांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बाहेरचं खाण्याचं टाळून आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यावर सातारकरांनी भर दिला. त्यामुळे हल्ली अनेकांच्या ताटात टोमॅटो, अंडी, बटर, दुग्धजन्य पदार्थ त्याचसोबत आंबा, रताळं, भोपळा आणि संत्री, मेथी, ब्रोकोली, सलाड यांसारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश होऊ लागला आहे.

शरीराला मुबलक प्रमाणात कर्बोदकं आणि प्रथिनं मिळण्यासाठी जीवनसत्त्व बी १ आवश्यक असतं. त्याचं ऊर्जेत रूपांतर होतं. त्याचसोबत आपल्या पेशी आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी याचा उपयोग होतो. हिरव्या पालेभाज्या, छोले, डाळी इ. घटकांचा आहारात समावेश आहे.

शरीरातील पेशींचा झालेला ऱ्हास भरून काढण्यासाठी बी ५ हे जीवनसत्त्व आवश्यक असतं. केस आणि त्वचा याबरोबरच जखमा भरण्यामध्ये जीवनसत्त्व बी ५ ची महत्त्वाची भूमिका असते. यासाठी आहारात बटाटे, मशरूम, अंड्याचा पिवळा बलक, दूध, सूर्यफुलाच्या बिया, ओट्स इत्यादी. मेंदूच्या विकासामध्ये जीवनसत्त्व बी ६ महत्त्वाची भूमिका असते. तसंच हिमोग्लोबिन वाढवण्यासदेखील मदत करतं.

चौकट :

१. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोजच्या जेवणात हे हवेच

कोणत्याही आजाराशी लढण्यात ‘अ’ जीवनसत्त्वाचा मोलाचा वाटा असतो. शरीराला मुबलक प्रमाणात कर्बोदकं आणि प्रथिनं मिळण्यासाठी जीवनसत्त्व बी आवश्यक असतं. हाडं मजबूत होण्यासाठी, शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी, मज्जातंतू व मेंदूच्या विकासासाठी कॅल्शिअम उपयुक्त असतं. मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य सुरळीत पार पडण्यासाठी, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी कोलीन आवश्यक असतं.

२. फास्टफूडवर अघोषित बंदी

कोविडची धास्ती अद्यापही अनेकांच्या मनातून गेलेली नाही. खाऊन घरातच बसणं होत असल्याने त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. हे लक्षात घेऊन अनेक कुटुंबांमध्ये फास्टफूडवर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.

३. कच्चा भाज्या, कडधान्ये...

१. मटकी आणि मूग या दोन्हीला घरात मोड आणले जातात. त्यात कांदा, टोमॅटो आणि सैंधव मीठ घालून याचा नाष्टा करण्याचे प्रयोग घरात सुरू झाले आहेत.

२. काकडी, बीट, टोमॅटो यात लिंबू, मिरची, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करूनही चार वाजताचा नाष्टा केला जातो.

३. कोबी, ब्रोकली, बेबीकॉर्न याचे उभे काप करून त्यात चाटमसाला घालून खाणं हे रात्रीच्या जेवणाला पर्याय ठरू लागला आहे.

गृहिणी कोट

१. भारतीय आणि त्यातही महाराष्ट्रीय अन्नसंस्कार सर्वोत्तम आहेत. सकस आणि आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रेसीपी घरात तयार करून त्या यूट्यूबवर लिंक करण्याचा मी प्रयत्न करते. यामुळे हे पदार्थ अनेकांपर्यंत पोहोचणं सोपं आहे.

- पल्लवी जाधव, सातारा

२. जंक फुड हे श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याचा प्लॅटफॉर्म असल्याचं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षांत आम्ही जंक फुड खाल्लं नाही किंवा त्याची हौस आम्हाला नाही, हे काहींना आऊटडेटेड वाटतं पण आम्हाला नाही फरक पडत.

- डॉ. मृणालिनी कोळेकर, सातारा

३. हॉटेलात जाऊन पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा माझ्या नातींना साताऱ्यात येऊन थालीपीठ खायला आवडतं. तांदळाचे घावण, ज्वारीच्या पिठाचे धिरडे हे प्रकार पुढच्या पिढीला समजावेत म्हणून मी करतेच. यातून सकस अन्न संस्कारही होतात.

- अंजली कुलकर्णी, सातारा

Web Title: Corona changed after Corona, Healthy food grew!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.