सोनगाव रुग्णांसाठी कोरोना नियंत्रण कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:09+5:302021-05-31T04:28:09+5:30

कुडाळ : जावळी तालुक्यातील सोनगाव येथे कोरोनाला रोखण्यासाठी गावातील माध्यमिक विद्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या महामारीच्या ...

Corona control room for Songaon patients | सोनगाव रुग्णांसाठी कोरोना नियंत्रण कक्ष

सोनगाव रुग्णांसाठी कोरोना नियंत्रण कक्ष

Next

कुडाळ : जावळी तालुक्यातील सोनगाव येथे कोरोनाला रोखण्यासाठी गावातील माध्यमिक विद्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष निर्माण केला आहे. या महामारीच्या काळात ‘माझे गाव माझी जबाबदारी’या सामाजिक भावनेने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ग्रामदक्षता समिती व ग्रामपंचायतीने कंबर कसली आहे. याला युवा वर्गाचीही मोठी मदत मिळत आहे.

सोनगाव गावात कोरोना बधितांचा आकडा वाढताना दिसत होता. यामुळे गावाने गावच्या आरोग्यासाठी हा निर्णय घेतला असून, ज्ञानमंदिराच्या ठिकाणी आता विलगीकरण कक्ष उभारले आहे. माझे गाव माझी जबाबदारी ही भूमिका प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. गावतील युवा वर्ग तसेच ग्रामपंचायत, सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने याठिकणी योग्य सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षासाठी लागणारा सर्व खर्च ग्रामपंचायत व प्रशासनाच्या माध्यमातून होणार आहे.

चौकट:

तरुणांचा पुढाकार...

कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा पुरवण्याचे काम प्रशासनाकडून विविध माध्यमातून होत आहे. आज गावोगावच्या शाळा, मंदिरे आरोग्यसेवेसाठी खुली करण्यात आली आहेत. संस्थात्मक विलगीकरणाकरिता याचा उपयोग होत आहे. जागतिक महामारीच्या संकटात ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता गावात प्राथमिक स्वरूपाची उपाययोजना करण्यासाठी आता सर्व ग्रामस्थ, तरुण वर्ग पुढाकार घेत आहेत.

Web Title: Corona control room for Songaon patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.