साताऱ्याने गाठला कोरोना मृत्यूसंख्येत ५ हजारांचा टप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:48+5:302021-07-18T04:27:48+5:30

सातारा : गतवर्षी मार्च महिन्यात सुरु झालेल्या कोरोनाच्या लाटेने आत्तापर्यंत जिल्ह्यात २ लाखांहून अधिक लोकांना बाधित केले आहे तर ...

Corona death toll reaches 5,000 in Satara | साताऱ्याने गाठला कोरोना मृत्यूसंख्येत ५ हजारांचा टप्पा

साताऱ्याने गाठला कोरोना मृत्यूसंख्येत ५ हजारांचा टप्पा

Next

सातारा : गतवर्षी मार्च महिन्यात सुरु झालेल्या कोरोनाच्या लाटेने आत्तापर्यंत जिल्ह्यात २ लाखांहून अधिक लोकांना बाधित केले आहे तर ५ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या आकाराच्या आणि लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या तशी जास्त आहे. पण, महामार्गावरील शहर आणि पुणे - मुंबईमध्ये बाधितांचे प्रमाण वाढल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यामध्ये झालेला प्रवेश यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. रुग्णालयात बेड मिळत नसल्याची परिस्थिती आणि गृह अलगीकरणामुळे बाधित वाढण्याच्या संख्येतही वाढ झाली. त्यामुळे जे लोक घराच्या बाहेरही पडले नाहीत, अशा लोकांनाही आपला जीव गमवावा लागला.

जिल्ह्यातील कोरोना मृतांची संख्या

सातारा - १२७०

कऱ्हाड - ९५६

फलटण - ४८८

पाटण - ३१२

जावळी - १८६

वाई - ३०९

महाबळेश्वर - ८५

माण - २८८

खटाव - ४९३

कोरेगाव - ३८९

खंडाळा - १५६

इतर - ७१

एकूण मृत्यू ५००३

Web Title: Corona death toll reaches 5,000 in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.