कोरोनामुळे बारा बलुतेदारांना आर्थिक पॅकेज द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:40 AM2021-04-27T04:40:03+5:302021-04-27T04:40:03+5:30
म्हसवड : बारा बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, ...
म्हसवड : बारा बलुतेदारांचे कोरोनाच्या लॉकडाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष करण पोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. हे लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत करण्यात आले आहे. या कालावधीत बारा बलुतेदारांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शासनाने बारा बलुतेदारांना मदत म्हणून स्वतंत्र आर्थिक पॅकेज देण्याची मागणी करण पोरे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदन माणच्या तहसीलदार माने यांच्यामार्फत दिले आहे. दि. ५ एप्रिलपासून राज्यात कोरोनाची
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन जाहीर केले आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, परीट, कासार, कोष्टी आदी १२ बलुतेदारांमधील छोट्या जातीतील परंपरागत व्यवसाय पूर्णतः बंद आहे. त्यामुळे आधीच गरीब परिस्थितीत असलेला हा समाज लॉकडाऊ मुळे अधिक जास्त आर्थिक अडचणीत आलेला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बाबतीत बेड उपलब्ध होत नाही, याकरिता कोविड केअर सेंटर तालुकास्थानी सुरू करून कोरोना रुग्णांची व्यवस्था व उपचार कसे चांगले होईल, याबाबत शासन स्तरावर प्रयत्न करण्याची मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.