कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:28 AM2021-06-02T04:28:42+5:302021-06-02T04:28:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ठणठणीत असलेल्या अनेकांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या आप्तांसह मित्रपरिवारात अचानक झालेल्या ...

Corona increased premature death; The number of testators has also increased! | कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ठणठणीत असलेल्या अनेकांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या आप्तांसह मित्रपरिवारात अचानक झालेल्या एक्झिटने खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांनी मृत्यूुपत्र तयार केले आहे. जगलो तर सोबत ठेवू आणि गेलोच तर कुटुंबाला दिशा देऊन जाऊ, हा त्यामागचा उद्देश!

सातारा जिल्ह्यात कोरोना संकटाने भयावह रूप धारण केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोविड मृत्यूचा दर अधिक असल्याने अनेकांना आयुष्याविषयी प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हिंदू कायद्यानुसार भारतीयांना त्यांच्या मृत्यूपूर्वी मृत्युपत्र किंवा वारसदार ठरविण्याचे तसेच संपत्ती वाटपाचे अधिकार आहेत. आपल्या पश्चात संपत्तीवरून कुटुंबात कटुता येऊ नये, या उद्देशाने पूर्वी सेवानिवृत्तीनंतर किंवा ६० वर्षांनंतर मृत्युपत्र करण्यात येत होती. कोरोनामुळे सर्वांनाच अकाली मृत्यूची भीती वाटत आहे. त्यामुळे श्रीमंतांसह मध्यमवर्गीयही मृत्युपत्र तयार करून ठेवत आहेत.

कोरोनामुळे अशाश्वत जगणं आणि अकाली मृत्यूची भीती अनेकांच्या मनात वाढली आहे. त्यामुळे सुशिक्षित व समजूतदार नागरिक त्यांच्या संपत्तीची विभागणी करून हयातीतच याबाबत स्पष्टता ठेवत आहेत. विशेष म्हणजे मृत्युपत्र तयार केल्यानंतर त्याची माहिती कुटुंबीयांनाही देण्यात येते.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) तीन बॉक्स

१ आपण कष्टाने कमावलेली इस्टेट आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. ती भलत्याच व्यक्तीने गिळंकृत करू नये, या हेतूने मृत्युपत्र केले आहे.

२ कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. माणसाच्या जिवाची खात्री राहिलेली नाही. अनेक कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाने गिळंकृत केली. आपलादेखील काही भरोसा नाही, हे लक्षात आल्याने पत्नीच्या नावावर मृत्युपत्र केले.

३ माझ्या पुण्यातील एका मित्राचं संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं. तो स्वतः, त्याची पत्नी आणि मोठा मुलगा मृत्युमुखी पडले. आता त्यांचा सर्वात लहान मुलगा आहे, अजूनही सज्ञान नाही. तो सज्ञान होईपर्यंत आम्हालाच त्याच्या इस्टेटीबाबत काळजी लागून राहिली आहे.

२) दोन वकिलांचे कोट्‌स

कोट.

कोरोनामुळे जीवनामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. बहुतांश लोक आरोग्य आणि आर्थिक चिंतेने ग्रासलेले आहेत. आपल्यानंतर मागे काय होईल, ही भीतीदेखील वाटत असल्याने मिळकतीमध्ये वाद नको म्हणून लोक मृत्युपत्र करून घेत आहेत.

-अॅड. विकास उथळे

कोट..

मृत्युपत्र हे माणूस जिवंत आहे, तोपर्यंत केवळ कागद असते. माणूस जिवंत असताना कुठल्याही वेळी ते बदलू शकतो. मुलांनी चांगला सांभाळ करावा या हेतूने देखील लोक मृत्युपत्र करतात. भविष्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होऊ नयेत, या हेतूने लोक मृत्युपत्र करू लागले आहेत.

अॅड. धनाजी शेलार

३) दुपटीने संख्या वाढली (बॉक्स)

कोरोनाआधी महिन्याकाठी मृत्युपत्र नोटरी करणाऱ्यांची संख्या ४० इतकी होती. आता मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार ती ७३ वर पोचली आहे.

Web Title: Corona increased premature death; The number of testators has also increased!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.