कोरोनाचा १८५ गावांत शिरकाव; ७६ गावे पुन्हा ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:38 AM2021-03-31T04:38:57+5:302021-03-31T04:38:57+5:30

कऱ्हाड : कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे असतानाच मार्च महिन्यापासून पुन्हा कहर सुरू झालाय. कऱ्हाड शहरासह तालुक्यात दररोज ...

Corona infiltrates 185 villages; 76 villages again in 'containment zone'! | कोरोनाचा १८५ गावांत शिरकाव; ७६ गावे पुन्हा ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये!

कोरोनाचा १८५ गावांत शिरकाव; ७६ गावे पुन्हा ‘कंटेन्मेंट झोन’मध्ये!

Next

कऱ्हाड : कोरोना संसर्गाची स्थिती आटोक्यात येण्याची चिन्हे असतानाच मार्च महिन्यापासून पुन्हा कहर सुरू झालाय. कऱ्हाड शहरासह तालुक्यात दररोज सरासरी पन्नास बाधितांची वाढ होत असून स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत असल्याचे दिसते.

कऱ्हाड तालुका सुरुवातीपासूनच कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ राहिलाय. जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील स्थिती समाधानकारक असताना कऱ्हाड तालुक्याने गतवर्षी एप्रिल महिन्यात रुग्णांची साखळी अनुभवली. वनवासमाची आणि मलकापूर ही दोन गावे त्यावेळी कोरोनाने ग्रासली होती. कालांतराने ही गावे कोरोनामुक्त झाली. मात्र, इतर गावात संसर्ग वाढत राहिला. एकापाठोपाठ अनेक गावे बाधित झाली.

सप्टेंबर महिन्यापर्यंत तालुक्यातील स्थिती भयावह होती. बाधितांसह मृत्युचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत होते. त्यामुळे प्रशासन हतबल झाले होते. अशातच ऑक्टोबरमध्ये दिलासा मिळाला. संक्रमणाचा वेग कमी झाला. रुग्णसंख्या घटली. कोरोनामुक्तीचे प्रमाणही वाढले. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र, असे असतानाच फेब्रुवारी अखेरपासून पुन्हा संक्रमणाचा वेग कमालीचा वाढला आहे. मार्च महिन्यात कऱ्हाड शहरासह तालुक्यातील बाधितांचा आकडा पाचशेपार गेला आहे. तसेच ७६ गावे कंटेन्मेंट झोनमध्ये आहेत.

- चौकट

कोरोना सरासरी

पॉझिटिव्ह रेट : १४.६९ टक्के

रिकव्हरी रेट : ९४.०७ टक्के

मृत्यू दर : ३.३३ टक्के

- चौकट

कऱ्हाड कोरोना अपडेट

एकूण बाधित : १०,४६५

कोरोनामुक्त : ९८३६

दुर्दैवी मृत्यू : ३५८

उपचारात : २७१

- चौकट

एकूण बाधित गावे : १८५

कोरोनामुक्त गावे : १०९

‘कंटेन्मेंट’मध्ये गावे : ७६

- चौकट

आरोग्य केंद्रनिहाय ‘कंटेन्मेंट’मधील गावे

काले : मलकापूर, कोयना वसाहत, आटके, नांदलापूर, काले

उंब्रज : भोसलेवाडी, शिवडे, वहागाव, चरेगाव, तळबीड, घोणशी, कळंत्रेवाडी, अंधारवाडी, कोर्टी, उंब्रज, खालकरवाडी

सुपने : सुपने, केसे, वारूंजी, साकुर्डी, मुंढे, डेळेवाडी, भोळेवाडी, पाडळी, म्होपे्र, तांबवे, विजयनगर

इंदोली : इंदोली, पाल, शिरगाव, साबळवाडी, पेरले, कोरीवळे

सदाशिवगड : सैदापूर, सुर्ली, पार्ले, वाघेरी, वनवासमाची, हजारमाची, बनवडी

मसूर : शामगाव, मसूर, कांबिरवाडी, रिसवड

कोळे : तारूख, कुसूर, आणे, कोळेवाडी, येणके, विंग, चचेगाव, बामणवाडी

वडगाव हवेली : गोळेश्वर, शेणोली, वडगाव हवेली, शेरे, कोडोली, कार्वे

रेठरे बुद्रुक : कासारशिरंबे, रेठरे बुद्रुक, जुळेवाडी, रेठरे खुर्द

येवती : घोगाव, येणपे, उंडाळे, साळशिरंबे, येळगाव, ओंड

हेळगाव : खराडे, पाडळी, गायकवाडवाडी, हेळगाव, कवठे, कोणेगाव, कालगाव

- चौकट

चारपेक्षा जास्त ‘अ‍ॅक्टीव्ह’ रुग्ण

कऱ्हाड शहर : ४८

मलकापूर : २३

सैदापूर : १४

कोयना वसाहत : ९

शेरे : ८

उंब्रज : ७

केसे : ७

कार्वे : ७

आटके : ६

इंदोली : ६

सुपने : ५

वहागाव : ४

गोळेश्वर : ४

वडगाव हवेली : ४

रेठरे बुद्रुक : ४

जुळेवाडी : ४

साळशिरंबे : ४

ओंड : ४

(आरोग्य विभागाच्या २९ मार्चच्या अहवालानुसार)

Web Title: Corona infiltrates 185 villages; 76 villages again in 'containment zone'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.