वाईत लसीकरणाची गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:25 AM2021-07-04T04:25:55+5:302021-07-04T04:25:55+5:30

वाई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या गतीने संसर्ग झाला. या लाटेमध्ये मृत्यूंचे प्रमाणही अधिक होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत ...

Corona invited to vaccinate in Wai! | वाईत लसीकरणाची गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण!

वाईत लसीकरणाची गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण!

googlenewsNext

वाई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या गतीने संसर्ग झाला. या लाटेमध्ये मृत्यूंचे प्रमाणही अधिक होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हा एकमेव पर्याय तज्ज्ञांनी अधोरेखित केला. यामुळे लसीकरण मोहिमेवर भर दिला जाऊ लागला. नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व व फायदे सिद्ध झाल्यानंतर नागरिक लस घेण्यासाठी केंद्रावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे ही गर्दी धोक्याची ठरू शकते.

अनेकदा लस उपलब्ध नसली तरी उपलब्ध लसीच्या कितीतरी पट नागरिक पहाटेपासून लसीकरण केंद्रावर गर्दी करत असल्यामुळे एकप्रकारे कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी निमंत्रण दिल्यासारखेच आहे. येथे शहराच्या विविध भागातून तसेच ग्रामीण भागातून नागरिक गर्दी करत असल्याने हे धोकादायक आहे. जिल्ह्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन असल्यामुळे वैद्यकीय सुविधा वगळता अत्यावश्यक सेवांसह सर्व व्यवसाय बंद ठेवले आहेत. परंतु, लसीकरणासाठी होणारी गर्दीच कोरोना पसरविण्याचे ठिकाण ठरतेय का? अशी स्थिती आहे.

४५ वर्ष वयोगटातील प्रथम डोस व दुसरा डोस घेणारे नागरिक पहाटेपासूनच लसीकरण केंद्रावर गर्दी करताना दिसत आहेत. कोणत्या गटाचे लसीकरण आज होणार नाही, ते सांगितले जाते. त्यामुळे शेकडो नागरिकांना परत जावे लागते. यामुळे तासनतास नागरिक एकमेकांच्या संपर्कात असतात, हे धोकादायक आहे. यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.

वाई तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या १५ दिवसांपासून २० ते ३०च्या आसपास येत असल्याने काहीशी समाधानकारक स्थिती आहे. आतापर्यंत वाई तालुक्यात १८ ते ४४ व ४५पेक्षा जास्त वयाच्या ५० हजारांवर नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरु झाले; परंतु कोरोना युद्धात निर्णायक ठरणाऱ्या लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन न केल्यास कोरोनावाढीचा धोका संभवतो.

चौकट :

पहिला व दुसरा डोसचे वेगवेगळे ठिकाण असावे..

प्रथम डोस व दुसऱ्या डोसचे वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्र केल्यास गर्दीला आळा बसू शकतो. वाई येथील कन्याशाळेत सर्व प्रकारच्या वयोगटातील पहिल्या व दुसऱ्या डोससाठी नागरिक एका ठिकाणी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केल्यास होणारी गर्दी टाळून कोरोना संसर्गाचा धोका टाळू शकतो.

कोट..

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण गतीने होण्याची गरज आहे. लसीचा पुरवठा अखंडित केला पाहिजे. याचबरोबर लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेणे ही गरजेचे आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा.

- भवरलाल ओसवाल, व्यापारी, वाई

०३ वाई

वाई येथील कन्याशाळेत लसीकरण सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.

Web Title: Corona invited to vaccinate in Wai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.