कोरोनामुळे कास पर्यटन कासावीस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:02+5:302021-04-13T04:37:02+5:30

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख ...

Corona makes Kas tourism twenty! | कोरोनामुळे कास पर्यटन कासावीस!

कोरोनामुळे कास पर्यटन कासावीस!

Next

पेट्री : कोरोनाच्या जागतिक महामारीने कास, बामणोली, पर्यटनावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दहा-पंधरा लाख पर्यटकांनी कासकडे पाठ फिरवल्याने वनव्यवस्थापन समिती, कास पुष्पपठार व्यावसायिक संघटना, हॉटेल चालक-मालक, उपव्यावसायिक वाहतूक संघ, सातारा हॉटेल व्यावसायिक, कास-बामणोली पर्यटन आणि यांच्यावर आधारित कर्मचाऱ्यांवर मोठी संक्रांत आली आहे.

दरवर्षी पावसाळ्यानंतर कास परिसरातील पर्यटनाला मोठ्याप्रमाणात सुरुवात होते. ऐन पावसाळ्यातदेखील वजराई धबधबा, एकीव, घाटाई दर्शन, बामणोली आणि कास परिसरात पर्यटकांची मांदियाळी असते. मागील काही वर्षांत पावसाळी पर्यटनाने हॉटेल व्यवसायाला अगदी सुगीचे दिवस आणले होते. जिल्हा, राज्य, परजिल्हा -राज्यासह, विदेशी नागरिकांनासुद्धा कासची आस लागलेली असते.

इथल्या पर्यटनाला अगदी नवीन महाबळेश्वरची चाहूल लागल्यामुळे येथील व्यवसायाला तेजीचे दिवस आले होते. परंतु मार्च २०२० पासून कोरोनामुळे कास पर्यटन ओस पडले. बघता-बघता दोन वर्षे हातातून निसटून गेली.

कास पुष्पपठाराला दरवर्षी दहा-बारा लाख पर्यटक भेट देतात. सातारा शहरात मुक्कामासाठी लॉज मिळणे अवघड होऊन जाते. 'पुष्प बहार' येण्याअगोदरच सर्व हॉटेल्स ॲडव्हान्स बुकिंगनी खचाखच होतात. परंतु आता केवळ ही स्वप्नात वाटणारी गोष्ट ठरते की काय, असे वाटू लागले आहे. परंतु मागील वर्षापासून या व्यावसायिकांची अवस्था पोटाला चिमटा घेऊन जगण्यासारखी झाली आहे. वनव्यवस्थापन समितीच्या पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे मोठे हाल झाल्याचे अध्यक्ष बजरंग कदम यांनी सांगितले.

कोट : कास रस्त्याशेजारील अनेक गावांना पर्यटनामुळे चार पैसे मिळण्याबरोबरच हाताला काम मिळत होते. मुंबई-पुण्याला पोटासाठी जाणारा लोकांचा लोंढा गावातच रोजगार मिळाल्याने चांगला स्थिरस्थावर झाला होता. परंतु कोरोनाच्या महामारीने बेरोजगारीबरोबरच उपासमारीची वेळ येऊन संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कास पर्यटनावर आधारित असणाऱ्या घटकांना शासनपातळीवर आर्थिक मदत होणे गरजेचे आहे.

सोमनाथ जाधव, अध्यक्ष, पठार विभाग भूमिपुत्र संघटना

Web Title: Corona makes Kas tourism twenty!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.