कोरोना बातमी हेडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:26+5:302021-04-20T04:41:26+5:30

......... साताऱ्यात एकीकडे कोरोना बाजी त्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र नागरिकांची बेफिकिरी दिसून येत आहे अनेक जण मॉर्निंग ...

Corona news header | कोरोना बातमी हेडर

कोरोना बातमी हेडर

googlenewsNext

.........

साताऱ्यात एकीकडे कोरोना बाजी त्यांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मात्र नागरिकांची बेफिकिरी दिसून येत आहे अनेक जण मॉर्निंग वॉकला बाहेर पडत असताना दिसत आहेत अशा लोकांवर खरतर कारवाई होणे गरजेचे आहे तरच तोरणाची ही लाट आटोक्यात येईल. गत काही दिवसांपासून सायंकाळच्या सुमारासही अनेकजण घराबाहेर वॉकिंगसाठी पडत आहेत. अशा लोकांवर ही कारवाई होणे गरजेचे आहे. तरच ही दुसरी कोरोनाची लाट आटोक्यात येईल. अनेक जण समर्थ मंदिर परिसरातील पावर हाऊस रस्त्यावर तसेच कुरणेश्वर रस्त्यावर चालत असताना दिसून येत आहेत. यामध्ये व वयोवृद्धांपासून तरुण मुलांचाही समावेश आहे.

.........

.........

जिल्ह्यातील विविध केंद्रावर सोमवारी नेहमीपेक्षा कमी लोकांना डोस देण्यात आला. लसीचा तुटवडा जाणवल्याने आरोग्य विभागाने काही केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आता केवळ ९ हजार डोस शिल्लक राहिले असून मंगळवारी लसीकरण मोहीम नेमकी कशी सुरू ठेवायची असा प्रश्न आरोग्य विभागाला पडला आहे. पुण्याहून येतानाच कमी डोस येत आहेत. हे डोस केवळ तीन दिवसात संपून जात आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाला लसीकरणासाठी वेग घेता येईना. मंगळवार दि. २० रोजी लस उपलब्ध झाली नाही तर बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात लसीकरण बंद ठेवावे लागणार आहे.

Web Title: Corona news header

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.