पार्ले येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:39 AM2021-05-18T04:39:53+5:302021-05-18T04:39:53+5:30
कोपर्डे हवेली : पार्ले (ता कराड ) येथे लसीकरणासाठी आलेल्या लोकांसाठी ग्रामपंचायतीने मंडपाची, पिण्याच्या पाण्याची तसेच बसण्यासाठी खुर्च्यांची ...
कोपर्डे हवेली : पार्ले (ता कराड ) येथे लसीकरणासाठी आलेल्या लोकांसाठी ग्रामपंचायतीने मंडपाची, पिण्याच्या पाण्याची तसेच बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करून नागरिकांप्रति दाखवलेली संवेदनशीलता उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी केले. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या लसीकरण केंद्रास दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच मोहन पवार, सदस्य अविनाश नलवडे, भाऊसाहेब घाडगे, अजित पाटील, विनायक माळी, डॉ. घाडगे उपस्थित होते.
ऐन उन्हाळ्यात दिवसभर चालणाऱ्या लसीकरणादरम्यान बनवडी, सैदापूर, पार्ले येथील मोठ्या संख्येने आलेल्या लोकांचे लसीकरण व्हावे, लोकसंख्येच्या प्रमाणात लसपुरवठा व्हायला हवा यासाठी प्रयत्न करत असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांच्याकडे लोकसंख्येच्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी पाठपुरावा करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सागर शिवदास यांनी दिले.
चौकट.....
जि. प. सदस्य निवास थोरात यांची धावती भेट....
निवास थोरात यांनी लसीकरणाबाबत माहिती घेत लसीकरणासाठी बाहेरगावांहून येणारे लोक आणि लसीचा होणारा पुरवठा यामध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा, ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात वाद होत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. उपकेंद्रांद्वारे लसीकरण सुरू असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील लोकही मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यांना लसीकरणासाठी केंद्रावर दिवसभर थांबावे लागते आहे. यामध्ये विशेषतः महिलांची गैरसोय होत आहे. यासाठी गावनिहाय लसीकरण झाले पाहिजे यासाठी आमची आग्रही भूमिका असून त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहितीही त्यांनी दिली.
फोटो ओळ.
पार्ले लसीकरण केंद्रास भेट देऊन जि. प. सदस्य निवास थोरात यांनी लसीकरणाबाबत चर्चा केली. यावेळी उपसरपंच मोहन पवार, अविनाश नलवडे, भाऊसाहेब घाडगे आदी.