चाफळ विभागात कोरोनाची पुन्हा ‘एण्ट्री’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:34 AM2021-03-14T04:34:07+5:302021-03-14T04:34:07+5:30
चाफळ आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे, आरोग्य सेवक डी.व्ही. गायकवाड यांनी काही जणांची कोरोना चाचणी केली. याचा ...
चाफळ आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कुराडे, आरोग्य सेवक डी.व्ही. गायकवाड यांनी काही जणांची कोरोना चाचणी केली. याचा अहवाल दोन दिवसांनी प्राप्त झाला. या अहवालानुसार तीनजण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अॅण्टीजेन चाचणीत एका हायस्कूलचा दहावीचा विद्यार्थी तर आरटीपीसीआर चाचणीत केळोलीतील दोन जणांचा अहवाल कोरोना बाधित आल्याने विद्यार्थी व पालकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. शाळेतील उर्वरित विद्यार्थी व बधितांच्या निकटवर्तीयांची चाचणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाहीत. आरोग्य विभागाकडून संबंधित गावात उपाययोजना केली जात आहे.
शाळेचा विद्यार्थी बाधित आला असतानाही शाळेचे मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीकडून अद्याप शाळा सुरू ठेवायची की नाही, याबाबत ठोस निर्णय न झाल्याने पालकांमधून संभ्रम निर्माण झाला आहे.