कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’, शंभर पोलिसांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:26 AM2021-06-11T04:26:15+5:302021-06-11T04:26:15+5:30
कऱ्हाड : कोरोनाच्या काळात शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्तावरील तब्बल शंभर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बुधवारी करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचेच ...
कऱ्हाड : कोरोनाच्या काळात शहरातील विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्तावरील तब्बल शंभर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बुधवारी करण्यात आली. त्यामध्ये सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलिसांमध्ये समाधान होते.
कोरोनाकाळात पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्या काळात पोलिसांची ड्युटी सकाळी सहा वाजता सुरू होत आहे. बंदबोस्तावरील सर्वच पोलीस पहाटेच घरातून निघतात. त्यामुळे सातत्याने लोकांच्या संपर्कात आहेत. फ्रन्टलाइन वर्कर म्हणून त्यांना दोन्ही लस दिल्या आहेत. मात्र, तरीही नागरिकांच्या संपर्कात असलेल्या पोलिसांच्या कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी पुढाकार घेऊन त्याची सुविधा केली. गुरुवारी दिवसभरात तब्बल शंभर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली. त्यामध्ये सर्वच पोलिसांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पोलिसांना बंदोबस्ताच्या ठिकाणी बळ यावे, यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या आहेत. पोलीस निरीक्षक पाटील यांच्या पुढाकाराने त्या पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी पोलीस निरीक्षक पाटील यांनी दीडशे कर्मचारी, अधिकाऱ्यांची मार्चपासून स्वखर्चाने नाश्त्याची सोय केली आहे. ड्युटीवरील पोलीस उपाशी राहू नयेत, याच उद्देशाने पोलीस निरीक्षक पाटील यांनी स्वखर्चाने व अंमलदार यांच्या मदतीने नाश्त्याची सोय केली होती.